By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 24, 2019 01:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंसोबत मनोवाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली होती. या बैठकीत कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देण्यात आले. अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच कुलसचिव व वित्त लेखा अधिकारी रजेवर गेल्यास त्यांचा कार्यभार विद्यापीठातील पात्र व ज्येष्ठ उपकुलसचिवांना द्यावा, असा शासन निर्णय असतानादेखील वेळोवेळी पात्र व्यक्तीला डावलले जात असल्याचा आरोप मुनोवाने केला आहे. या विरोधात मुनोवाच्या वतीने 24 एप्रिलपासून आंदोलन करण्यात येणार असून आंदोलन काळात कर्मचारी काळ्या फिती बांधून काम करणार असल्याचे मुनोवाचे अध्यक्ष दीपक वसावे, उपाध्यक्ष कृष्णा पराड, सचिव विनोद मळाळे यांनी स्पष्ट केले.
देशाचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारींनी बालाकोट एअर स्ट्राइकवर नागरिकां....
अधिक वाचा