By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 05, 2019 11:31 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महिन्याभारत एकही सुट्टी न घेणार्या मुंबई महानगरपालिका कर्मचार्यांना बायोमेट्रिक हजेरी यंत्रणेतील दोषामुळे 81 ते 100 रुपये पगार हातात येत आहे. एनेकदा इंटरनेट नेटवर्क नसल्यामुळे कर्मचार्यंची हजेरी लागत नाही. त्यामुळे महिनाभर प्रामाणिक काम करणार्या काही कर्मचार्यंच्या खात्यावर 81 रुपये पगार जमा झाला आहे. त्यामुळे पालिका कर्मचार्या मध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या संदर्भात अधिक माहीती अशी की कामचुकार कर्मचार्यांन लगाम घालण्यासाठी पालिकेने बायोमेट्रिक हजेरी व सप प्रणाली सुरू केली. त्यामुळे कामगारान मध्ये शिस्त आली. परंतु कित्येक वेळा इंटेरनेट बंद पडल्यामुळे कर्मचारी हजर असूनही त्याची गैरहजेरी लागते. गेल्या जानेवारीपासून या प्रणालीच्या घोळाचा फटका कामगारांना बसत आहे. पालिकेच्या गिरगाव येथील 'डी' विभागातील सुमारे 60 ते 70 टक्के कामगारांच्या जूनच्या वेतनात पुन्हा मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे. या विरोधात म्युन्सिपल मजदूर यूनियन चे कार्यध्यक्ष वामन कविसकर, सरचिटणीस अरुण नाईक, उपाध्यक्ष संघटक प्रवीण मांजळकर यांनी सहायता आयुक्त विश्वास मोते यांची भेट घेऊन कामगारांचे कापलेले पगार त्वरित खात्यात जमा करा, अशी आग्रही मागणी केली. दोन दिवसात सर्व कामगारांचे कापलेले पगार पुन्हा मिळतील यासातीहीची आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश मोते यांनी दिले.
बायोमेट्रिक हजेरी यंत्रणेतील घोळावर उपाय म्हणून पालिका प्रशासनाणे काही विभागातमध्ये जुन्या पद्धतीने हजेरी लावण्यास सुरवात केली आहे. बायोमेट्रिक हजेरी यंत्रणेतील घोळाला खातेप्रमुखांना जबाबदार धरण्याचा आदेश पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिला असताना घोळ सुरूच असल्याचे यातून दिसत आहे.
मुंबई गोवा महामार्गावर पडलेल्या खाद्यामुळे संताप अनावर झाल्यामुळे आमदार ....
अधिक वाचा