By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 17, 2024 01:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबईकरांचा प्रवास सुसाट! विनोद तावडे यांनी शेअर केलेला व्हिडीओ पाहून ही मुंबई मेट्रो आहे यावर विश्वासच बसणार नाही. पाहा तुम्हाला कोणतं स्थानक फायद्याचंल
मुंबईकरांचा प्रवास म्हटलं की अनेकांनाच ही बाब म्हणजे तारेवरची कसरत वाटते. शहरात नव्या आलेल्या व्यक्तींना तर, हे गणित उमगण्यास बराच वेळ द्याला लागतो. अशा या मुंबई शहराचा वेग आता खऱ्या अर्थानं आणखी वाढणार आहे. कारण, शहरातील मोक्याच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं लवकरच लोकार्पण होणार आहे.
विनोद तावडे यांनी X च्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार 24 जुलै 2024 रोजी मुंबई शहरातील पहिली भूमिगत मेट्रो सुरू होणार असून, मुंबईकरांना या मार्गानं प्रवास करता येणार आहे. या मेट्रोच्या मार्गामुळं शहरातील नागरिकांचा प्रवास खऱ्या अर्थानं सुसाट होणार आहे. तावडे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमुळं भूमिगत मेट्रोचं एकंदर रुप कसं असेल, हा प्रवास कसा असे याची कल्पना येत आहे. ज्यामुळं नागरिकांनी आतापासूनच या प्रवासासाठी उत्सुकता दर्शवल्याचं पाहायला मिळत आहे.
महत्त्वाकांक्षेला तंत्रज्ञानाची जोड देणाऱ्या मुंबईतील या पहिल्या भूमिगत मेट्रोमध्ये 33.5 किमी इतकं अंतर वाऱ्याच्या वेगान ओलांडणं सहज शक्य होणार आहे. आरे कॉलनी इथून हा प्रवास सुरू होणार असून त्यातील अंतीम स्थान असेल बीकेसी अर्थात वांद्रे कुर्ला संकुल. तब्बल 27 स्थानकांच्या या भूमिगत मेट्रोमध्ये 26 स्थानकं ही जमिनीखाली अर्थात शहराच्या शब्दश: उदरातून जाणार आहेत.
साधारण 37000 कोटी रुपये खर्ची घालून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळं शहरातील वाहतूक कोंडीतून अनेकांचीच सुटका होणार असून, त्यांचा प्रवास सुकर होणार आहे. प्राथमिक माहितीनुसार ही मेट्रो सेवा सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरू होणार असून, रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या मेट्रोचा वेग जवळपास ताशी 90 किमी इतका असेल. एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार या वेगानं 35 किमीचं हे अंतर भूमिगत मेट्रोनं अवघ्या 50 मिनिटांमध्ये ओलांडता येणार आहे, म्हणजेच तासाभराहून कमी वेळ.
भूमिगत मेट्रोचा पहिला टप्पा जुलै महिन्याच्या अखेर सुरू होत असतानाच दुसऱ्या टप्प्यासह हा संपूर्ण प्रकल्प पुढील आठ महिन्यांमध्ये पूर्णत्वास जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळं येत्या काही महिन्यांमध्ये मुंबई एका नव्या आणि तितक्याच कमाल रुपात जगासमोर येणार असंच म्हणावं लागेल.
यवतमाळच्या आर्णी येथील भूमिका डांगे या विद्यार्थिनीने नीट ची झालेली फेरपर....
अधिक वाचा