By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 18, 2020 12:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्यानं वाढत आहे. महाराष्ट्रात काल (17 मार्च) कोरोनाचा पहिला बळी मुंबईमध्ये गेल्याने लोकांमध्ये भित्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेकडो प्रवाशी आपल्या परिवारासोबत गावी निघाले आहेत. तीन ते चार तास एसटी महामंडळाच्या बसेस नसल्याने खासगी बसेसने लोक गावी जात आहेत. पण खासगी बसेस दरोरजपेक्षा अधिक प्रवास भाडे घेत आहेत. त्यामुळे लोकांना याचा फटका बसत आहे. सातारा,कराड जाण्यासाठी 300 रुपये लागतात पण सध्या प्रवाशांकडून 500 ते 700 रुपये घेतले जात आहेत.
वाशी ते बेलापूरपर्यंत संधाकाळी 6 वाजल्यापासून लोकांनी गावी जाण्यासाठी हायवेवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मिळेल त्या बसेसने लोक गावी जात होते. राज्यात कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून अत्यावश्यक सेवा वगळून शाळा, महाविद्यालय आणि खाजगी कंपन्या यांनी सेवा बंद केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी, प्रवाशी मोठ्या प्रमाणात आपल्या परिवारसोबत गावी जात आहेत.
प्रवाशी गावी जात असल्यामुळे अधिक बस गाड्या सोडण्याची आवश्यकता होती. अधिक गाड्या नसल्याने खासगी बसेस प्रवाशांची मोठ्या प्रमाणात लूट करत आहेत. यावर परिवहन मंत्री कारवाई करतील का असा प्रश्न नागरिकांनी केला.
दरम्यान, राज्यात कोरोना दिवसेंदिवस फोफावत चालला आहे. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 41 वर पोहोचली आली. कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे प्रयत्न करत आहे.
देशात कोरोना व्हायरसने (Corona Virus) हाहाकार माजला आहे. आतापर्यंत देशात १२५ पेक्षा ....
अधिक वाचा