By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जुलै 01, 2019 12:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
गेल्या वर्षी सुरू झालेली आणि निवडणूक धामधुमीत गायब झालेली प्लॅस्टिक बंदी महाराष्ट्रात पुन्हा सुरू होणार असल्याची घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत बोलताना केली. गेल्या वर्षी एयन पावसाळ्यात ही प्लास्टीक बंदी सुरू झाली होती. त्यामुळे पावसाळ्यात प्लॅस्टिक ची सवय झालेल्या सामान्य माणसाची अनेक बाबतीत तारांबळ उडालेली होती. प्रशासनाने तातडीने अमलबजावणी करून अनेक जणांवर कारवाईही केली होती. पण नंतर ती कारवाई थंडावली होती. आता पुन्हा ही कारवाई पावसाळ्यातच सुरू होणार आहे.“प्लॅस्टिक बंदी असूनही दररोज प्लॅस्टिक दिसत आहे, त्यासाठी सरकार काय ठोस भूमिका घेणार आहे?” असा प्रश्न राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी केला त्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्रीमहोदयांनी ही घोषणा केली.
मुंबई महानगरपालिकेने या कामासाठी काही अधिकारी नेमले होते. निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे हे काम थांबले होते. मात्र आता मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट , दादर बाजार अश्या मुख्य बाजारपेठेत ही कारवाई सुरू झाली असून त्याचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसून येतील, असे मंत्र्यांनी सांगितले.
प्लॅस्टिक बंदीमुळे प्लॅस्टिक उत्पादन करणारे कारखाने बंद केले आहेत. त्यामुळे बेरोजगार झालेल्या कामगारांना नुकसान भरपाई देणार काय ? ह्या राज पूरोहित आणि मंगल प्रभात लोढा यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना रामदास कदम यांनी संगितले की, या व्यवसायात असलेल्या व्यापारांनी इतर व्यवसायाकडे वळावे. या पुढे प्लॅस्टिक कारखाने पुन्हा सुरू होऊ देणार नाही तसेच महाराष्ट्रात येणार्या प्लॅस्टिक पैकी 90 टक्के गुजरात मधून येत आहे. त्यामुळे पंतप्रधानांना पत्र पाठवून गुजरात मध्येही प्लॅस्टिक बंदी करावी अशी मागणी करणार आहे.
प्लॅस्टिकमुळे शहरी व ग्रामीण भागात अनेक पर्यावरणीय समस्या वेळोवेळी उद्भवत असतात त्यामुळे अनेक प्रकारचे आरोग्याचे प्रश्नही भेडसावतात हे वेळीच रोखवेत ह्यासाठी संपूर्ण प्रयत्न करत राहिले तरच प्लॅस्टिक बंदी यशस्वी होइल.
बेळगाव – हुककेरी तालुक्यात बिद्रेवाडी गावातील शेतकरी राजू मारयाळ यांच्य....
अधिक वाचा