ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कंगनाच्या घराबाहेर गर्दी गोळा करुन भडकावल्याचा आरोप, मुंबई पोलिसांचा रिपब्लिक टीव्हीला समन्स

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 10, 2020 10:05 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कंगनाच्या घराबाहेर गर्दी गोळा करुन भडकावल्याचा आरोप, मुंबई पोलिसांचा रिपब्लिक टीव्हीला समन्स

शहर : मुंबई

बनावट टीआरपीच्या आरोपांनी आधीच अडचणीत आलेल्या रिपब्लिक टीव्हीच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आता रिपब्लिक टीव्हीवर अभिनेत्री कंगना रनौतच्या घराबाहेर गर्दी जमवण्याचा गंभीर आरोप झाला आहे. या प्रकरणी मुंबई पुलिसांनी रिपब्लिक टीव्हीला समन्स पाठवलं आहे. या प्रकरणात 15 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीच्या रिपोर्टरला समन्स पाठवलं आहे. कंगना रनौतचं घर खार पोलीस स्टेशन अंतर्गत येतं. रिपब्लिक टीव्हीवर कंगनाच्या घराबाहेर लोक जमवून त्यांना भडकावल्याचा आरोप आहे. या प्रकरणात जबाब नोंदवण्यासाठी मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीच्या रिपोर्टरला समन्स पाठवलं आहे.

मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी म्हटलं आहे, “या प्रकरणात रिपब्लिकच्या रिपोर्टचा जबाब महत्त्वाचा आहे. त्यांना समन्स मिळाल्यावर तात्काळ पोलिस स्टेशनला हजर होण्यास सांगण्यात आलं आहे. गर्दी जमवून भडकावल्याच्या आरोपाखाली चौकशीसाठी खार पोलिसांनी आतापर्यंत 15 पेक्षा अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. त्यांचीही कसून चौकशी सुरु आहे.

बंगला पाडकामाच्या दिवशी काय झालं होतं?

9 सप्टेंबर रोजी बीएसमीने बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या पाली हिल्स येथील कार्यालयातचं बेकायदेशीर बांधकाम पाडलं होतं. बीएमसीची ही कारवाई सुरु असताना त्या ठिकाणी काही लोकांनी जमा होऊन गोंधळ घातला होता. यानंतर मुंबई पोलिसांनी या सर्वांना तेथून पिटाळून लावले. याच प्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास केला असता ही गर्दी रिपब्लिक टीव्हीचे रिपोर्टरने जमा केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे संबंधित रिपोर्टरला पोलिसांनी चौकशीसाठी समन्स पाठवलं आहे. या चौकशीनंतर मुंबई पोलीस पुढील कारवाई करणार आहे.

मागे

लोकल सुरु करण्यासाठी तातडीने धोरण आखा; मंत्र्यांवरही जबाबदारी सोपवा- हायकोर्ट
लोकल सुरु करण्यासाठी तातडीने धोरण आखा; मंत्र्यांवरही जबाबदारी सोपवा- हायकोर्ट

मुंबईतील रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी योजनाबद्ध धोरण तयार करा, अशी सूचना मु....

अधिक वाचा

पुढे  

Maharashtra Unlock | येत्या नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्र पूर्ण अनलॉक होणार? राजेश टोपेंचे संकेत
Maharashtra Unlock | येत्या नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्र पूर्ण अनलॉक होणार? राजेश टोपेंचे संकेत

“राज्यात आता लॉकडाऊनचा विषय राहिलेला नाही. येत्या नोव्हेंबरपर्यंत महारा....

Read more