ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पेट्रोलिंग करणारा कर्मचारी स्पॉटवर पोहोचला की नाही? पोलिसांवर आता QR code ची नजर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 16, 2020 09:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पेट्रोलिंग करणारा कर्मचारी स्पॉटवर पोहोचला की नाही? पोलिसांवर आता QR code ची नजर

शहर : मुंबई

विविध ठिकाणी पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर (Patrolling Police) लक्ष ठेवण्यासाठी त्याचबरोबर त्यांना अधिक जबाबदार आणि सक्षम बनविण्यासाठी आता मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. मुंबई पोलीस विभाग आता क्यूआर कोड या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवणार आहेत. त्याच अनुषंगाने मुंबईच्या विविध ठिकाणी क्यूआर कोड लावला गेला आहे. त्या माध्यमातून संबंधित ठिकाणी पोहोचल्यावर पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस स्टाफला तिथे लावलेल्या क्यूआर कोडला स्कॅन करावा लागणार आहे आणि त्यानंतर त्याची अपडेटेड माहिती कंट्रोल रूमला पाठवावी लागणार आहे. संबंधित पेट्रोलिंग करणारा पोलीस कर्मचारी ठरावीक ठिकाणी गेला होता की नाही, हे क्यूआर कोडच्या माध्यमातून स्पष्ट होणार आहे.

सध्या काही महत्त्वाच्या ठिकाणी क्यूआर कोड सिस्टीम लावली गेली आहे. लवकरच मुंबईभर अशी व्यवस्था सुरू केली जाणार आहे. ही सिस्टीम पूर्णतः लागू झाल्यानंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर नजर ठेवणं सोप होणार आहे आणि इतर कामात पोलीस आपला वेळ वाया घालवणार नाही. पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला प्रत्येक दोन तासांत आपली आणि संबंधित ठिकाणाची माहिती क्यूआर कोड स्कॅन करून द्यावी लागणार आहे.

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी 80 हजारांपेक्षा अधिक फेसबूक अकाऊंट तयार करण्यात आले होते असा दावा मुंबई पोलिसांनी केला होता. या प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशावर सायबर सेलने आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन अधिक चौकशी सुरु केली आहे.

मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी सुरू असलेल्या अभियानावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. आता सायबर सेल या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू करत आहे, असं मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सांगितले होते. दुसरीकडे मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी खोटे क्यूआर कोड पास बनवून देणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी गेल्या काही दिवसांपूर्वी अटक केली होती. तसेच ज्या व्यक्तींना त्याने पास बनवून दिले आहेत, त्यांनाही अटक करण्यात आली होती. खोटे क्यूआर कोड पास बनवल्याप्रकरणी मुंबईत एकूण सहा गुन्ह्यांची नोंद झाली होती.

मागे

दिल्लीमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला; प्रत्येक तासाला 4 रुग्णांचा मृत्यू
दिल्लीमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला; प्रत्येक तासाला 4 रुग्णांचा मृत्यू

देशाची राजधानी दिल्लीमध्ये तासाला 4 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू होत असल्याची ....

अधिक वाचा

पुढे  

मुंबईकरांना दिवाळी भेट! बेस्टच्या ताफ्यात येणार अत्याधुनिक डबल डेकर बसेस
मुंबईकरांना दिवाळी भेट! बेस्टच्या ताफ्यात येणार अत्याधुनिक डबल डेकर बसेस

मुंबईकरांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी बेस्ट प्रशासनाने कंबर कसली आहे. त्....

Read more