By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 28, 2020 11:14 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कोरोनाच्या संकटामुळे यंदा 31 डिसेंबरच्या रात्री सार्वजनिक ठिकाणी जमण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे आता अनेकांनी घरीच थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन (31st Celebration) करायचे ठरवले आहे. मात्र, आता या पार्ट्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन होते की नाही, यावर पोलिसांकडून नजर ठेवली जाणार आहे. ( New year and 31st December celebration in Mumbai)
विशेषत: गच्चीवरच्या पार्ट्यांवर पोलिसांची नजर असणार आहे. 31 डिसेंबरच्या रात्री सुरक्षेसाठी सुमारे 31 हजार पोलीस हे रस्त्यावर तैनात असून ड्रोनच्या माध्यमातूनही सगळ्यांवर पहारा ठेवला जाणार आहे.
31 डिसेंबरला सार्वजनिक ठिकाणी काय नियम आहेत?
मुंबईत रात्री 11 ते पहाटे सहापर्यंत जमावबंदीचे नियम लागू आहेत. त्यामुळे गेट वे, मरीन ड्राईव्ह, गिरगाव, दादर, जुहू चौपाटी येथे तुम्हाला संध्याकाळपासून जाता येईल. मात्र, चारपेक्षा कमी लोक असणे ही मुख्य अट आहे.
बारमधली पार्ट्या 11 च्या आतच आटपणार
एरवी 31 डिसेंबर म्हटलं की मुंबईतील पब, बार आणि रेस्टॉरंटसमध्ये उत्सवाचे वातावरण असते. मात्र, यंदा नाईट कर्फ्यूमुळे या पार्ट्या अकराच्या आतच आटपाव्या लागणार आहेत. रात्री अकरानंतर पब्ज आणि डिस्को बंद असतील.
ड्रिंक अँड ड्राईव्ह रोखण्यासाठीही चोख व्यवस्था
31 डिसेंबरच्या रात्री आणि त्यानंतर पहाटे मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या तळीरामांना रोखण्यासाठी पोलिसांनी नेहमीप्रमाणे खास बंदोबस्त केला आहे. यंदा कोरोनामुळे चालकांची ब्रिथ अनालायझरद्वारे तपासणी होणार नाही. पण व्यक्ती मद्यधुंद असल्याचे आढळल्यास त्याला जवळच्या रुग्णालयात नेऊन त्याची तपासणी केली जाईल.
5 जानेवारीपर्यंत नाईट कर्फ्यू
राज्यात 22 डिसेंबरपासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही संचारबंदी 5 जानेवारीपर्यंत लागू राहील. त्याचबरोबर संपूर्ण यूरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील 15 दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.
शिवसेनेचे दिग्गज नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना स....
अधिक वाचा