ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

साताऱ्यातून मुंबईकडे येणाऱ्या एसटीला अवजड वाहनाची जोरदार धडक, एकाचा मृत्यू, 16 जण गंभीर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 26, 2020 09:47 AM 2019-02-12T14:15:30+5:30

साताऱ्यातून मुंबईकडे येणाऱ्या एसटीला अवजड वाहनाची जोरदार धडक, एकाचा मृत्यू, 16 जण गंभीर

शहर : मुंबई

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर 16 जण गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व जखमींवर नवी मुंबईच्या कामोठे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त झालेली बस ही साताऱ्यातून मुंबईकडे येत होती. त्यावेळी अचानक एका ट्रेलर किंवा ट्रक यासारख्या अवजड वाहनाने एसटीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, बसच्या एका बाजूचा पत्रा पूर्णपणे कापला गेला. यामुळे झोपेत असलेल्या प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरुन जुन्या एक्सप्रेस वे वर जाताना येणाऱ्या पनवेल एक्झिटजवळ हा अपघात झाला. ही बस पुण्याहून मुंबईत येत होती. त्याचवेळी रात्री 1.30 च्या सुमारास हा भीषण अपघात घडला.

या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही मृत व्यक्ती ही मुंबईतील बेस्टचे चालक असल्याची माहिती समोर येत आहे. तर या अपघातात बस चालकासह 16 जण जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना तात्काळ IRB यत्रंणा, महामार्ग वाहतूक पोलीस पळस्पे टँप यांनी MGM रुग्णालयात दाखल केले आहे. या सर्व जखमींवर कामोठेतील MGM रुग्णालयात उपचार सुरु आहेत.दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला, याची अद्याप माहिती मिळालेली नाही. या अपघातातील जखमींवर पनवेल आगार प्रमुख विलास गावडे आणि इतर पनवेल डेपोतील अधिकारी वर्ग रुग्णालयात उपस्थित आहे. हे सर्व जण जखमीची काळजी घेत आहेत.

मागे

पुणेकरांनो सावधान! कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढण्यास सुरुवात, बुधवारी एका दिवसात 1 हजार 25 रुग्ण!
पुणेकरांनो सावधान! कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढण्यास सुरुवात, बुधवारी एका दिवसात 1 हजार 25 रुग्ण!

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना पाहायला मिळतोय. पुण्यातही रु....

अधिक वाचा

पुढे  

लॉकडाऊनसाठी आता राज्यांना केंद्र सरकारची परवानगी आवश्यक; गृहमंत्रालयाची नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनसाठी आता राज्यांना केंद्र सरकारची परवानगी आवश्यक; गृहमंत्रालयाची नवी नियमावली जाहीर

देशातील कोणत्याही राज्यात लॉकडाऊन लागू करायचा असेल, तर आता त्यासाठी केंद्र....

Read more