By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 20, 2020 02:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट-विरार या एसी लोकलमध्ये प्रवाशांना लवकरच खरेदी करता येणार आहे. गेल्या वर्षी पश्चिम रेल्वेनं लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये 'शॉपिंग ऑन व्हील्स' ही योजना सुरू केली होती. मात्र, आता पहिल्यांदाच उपनगरी लोकलमध्ये अशा प्रकारची योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळं प्रवाशांना लोकलमध्येच विविध वस्तू खरेदी करता येणार आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, त्वचा आणि केसांची निगा राखणारी उत्पादनं, कॉस्मेटिक्स, आरोग्याशी संबंधित उत्पादने, मिठाई, लॅपटॉप- मोबाइल अॅक्सेसरीज, लहान खेळणी आणि स्टेशनरी आदी वस्तू एमआरपीनुसार खरेदी करता येतील. पश्चिम रेल्वेनं विक्रेत्यांच्या निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे असून, हे विक्रेते एसी लोकलमध्ये ट्रॉली घेऊन फिरणार आहेत. या विक्रेत्यांकडे असेलली ट्रॉली तीन फूट उंच आणि एक फूट रुंद असेल. एकूण चार विक्रेते लोकलमध्ये दोन ट्रॉली घेऊन फिरणार आहेत.
लोकलमधील विक्रेते हे प्रवाशांना वस्तू खरेदी करण्यास जबरदस्ती करणार नाहीत. या विक्रेत्यांना गणवेश दिला जाणार आहे आणि त्यांच्याकडे ओळखपत्रेही असणार आहेत. याशिवाय त्यांच्याकडे विक्रीसाठी असलेल्या वस्तूंची माहिती देणारे पत्रकही असेल. कोणत्या वस्तू विक्रीसाठी आहेत याची माहितीही या विक्रेत्याला विचारता येणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या एका अधिकाऱ्यानं दिली.
'सकाळी आठ वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत एसी लोकलमध्ये वस्तू विकल्या जाणार आहेत,' असं एका अधिकाऱ्यानं नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितलं. हे कंत्राट पाच वर्षांसाठी असेल. सध्याच्या घडीला उपनगरी लोकलमध्ये स्टेशनरी, खाद्यपदार्थ विकले जातात. पण उपनगरी लोकलमध्ये अशा प्रकारे वस्तूंची किंवा खाद्यपदार्थांची विक्री करणं बेकायदा आहे.
मुंबई - पोलीस दलात तब्बल ८८ वर्षांनी पुन्हा अश्वदलांचा समावे....
अधिक वाचा