ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईत तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 28, 2019 10:50 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईत तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक

शहर : मुंबई

मध्य रेल्वे हार्बर आणि पश्चिम रेल्वे या तिन्ही मार्गावर रविवारी २८ एप्रिलला मेगाब्लॉक घेण्यात आलाय. रेल्वेच्या विविध कामांनिमित्त रविवारी मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्ग, हार्बरवरील वडाळा ते मानखुर्द दोन्ही मार्ग आणि पश्चिम मार्गावर बोरिवली ते अंधेरी दोन्ही धिम्या मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेवर  मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्गावर २८ एप्रिल सकाळी ११.१५ वाजता ते दुपारी ३.४५ वाजता मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या जलद मार्गावर ब्लॉक असल्याने लोकल गाड्या दिवा ते परळदरम्यान धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. लोकल गाड्या वीस मिनिटे उशिराने धावतील. हार्बर मार्गावर वडाळा ते मानखुर्द दोन्ही मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजता ब्लॉक असणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी, बेलापूर, पनवेल दरम्यानच्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते अंधेरी दोन्ही धिम्या मार्गावर ब्लॉक असणार आहे. सकाळी १०.३५ ते दुपारी ३.४५ वाजता ब्लॉक असणार आहे. या ब्लॉकमुळे सांताक्रूझ ते बोरिवलीदरम्यान धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.

मागे

औरंगाबादच्या प्राणी संग्रहालयातील ‘समृद्धी’ झाली चार बछड्यांची आई
औरंगाबादच्या प्राणी संग्रहालयातील ‘समृद्धी’ झाली चार बछड्यांची आई

औरंगाबादच्या प्राणी संग्रहालयात ‘समृद्धी’ या वाघिणींने चार बछड्यांना ....

अधिक वाचा

पुढे  

पश्चिम रेल्वे मार्गावरील महालक्ष्मी आणि लोअर परळ पादचारी पूल आजपासून बंद
पश्चिम रेल्वे मार्गावरील महालक्ष्मी आणि लोअर परळ पादचारी पूल आजपासून बंद

पश्चिम रेल्वे मार्गावरील महालक्ष्मी आणि लोअर परळ या स्थानकांवरील पादचारी ....

Read more