By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 23, 2020 08:39 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबईत मंगळवारी संध्याकाळपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत आतापर्यंत 150-200 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. मुंबईतील हिंदमाता, दादर, वरळी, लोअर परेल, सायन, वांद्रे यांसह ठिकठिकाणी गुडघ्याएवढं पाणी साचलं आहे. तसेच सांताक्रुझ, अंधेरी यासह पश्चिम उपनगरात घरांमध्ये पाणी शिरले आहे.
मुंबईतील मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा तसेच रस्ते वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. अनेक रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रेल्वे रुळ पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वे तसेच पश्चिम रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक कर्मचारी हे अडकून पडले आहेत.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टी च्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे तसेच, नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.#MumbaiRains
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 23, 2020
मुंबईत अतिवृष्टीची शक्यता
मुंबईत येत्या 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांसाठी यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या भागात मुसळधार पाऊस होऊ शकतो. तर पालघर जिल्ह्यातही ऑरेंज अॅलर्ट दिला असल्याने त्या ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन प्रशासनातर्फे केले जात आहे.
Rainfall causes water-logging in several areas across Mumbai: Grant Rd to Charni Rd, Lower Parel to Prabhadevi, Dadar to Matunga, Matunga to Mahim.Local trains b/w Churchgate to Andheri cancelled,locals b/w Virar to Andheri long-distance special trains rescheduled:Western Railway pic.twitter.com/2q78AEptyH
— ANI (@ANI) September 23, 2020
पावसाने मुंबईला पुन्हा एकदा चांगलंच झोडपलं आहे. मुंबईमध्ये गेल्या काही तास....
अधिक वाचा