By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 03, 2020 11:36 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज (3 जुलै) मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याकडून मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईच्या किनारपट्टी भागात समुद्रात उंच लाटा उसळताना दिसत आहेत. या लाटांची उंची 4.41 मीटर इतकी आहे.
Maharashtra: Mumbai receives heavy rainfall; Visuals from King's Circle pic.twitter.com/uD1w4Rlkuk
— ANI (@ANI) July 3, 2020
मुंबईसह उपनगरातही मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे आतापासूनच ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे. उपनगरातील कांदिवली, मलाड, बोरीवली भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे.
घरातच थांबा, मुंबई पोलिसांचे आवाहन
#HeavyRainfallAlert
— Mumbai Police (@MumbaiPolice) July 2, 2020
The @Indiametdept has forecasted ''heavy to very heavy rain at isolated places" for Fri & Sat for Mumbai.
All citizens are advised to remain indoors, not venture out unnecessarily and take necessary precautions.#MumbaiRains
मुंबईत दोन दिवस (3 आणि 4 जुलै) मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना दोन दिवस घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. मुंबईसह ठाणे, पालघरला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कुणीही विनाकारण घराबाहेर पडून नका, घरातच राहा, असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे.
महाराष्ट्रात जून महिन्यात पाऊस दाखल झाला. मात्र, गेल्या आठवड्याभरापासून मुंबई आणि ठाण्यात पाऊस पडलेला नाही. दरम्यान, हवामान विभागाने मुंबई आणि ठाण्यात पुन्हा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळणार आहे.
मुंबईत मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार या महिन्यात मुंबईसह संपूर्ण कोकणात भरपूर पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढच्या 24 तास मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांच्या काही भागात मुसळधार पाऊस कोसळणार आहे. याशिवाय रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील काही भागातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यानंतर पुण्यात येणाऱ्या परप्रांतिय नागरिक, म....
अधिक वाचा