ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालय 15 जानेवारीपर्यंत बंद, मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 30, 2020 08:38 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालय 15 जानेवारीपर्यंत बंद, मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय

शहर : मुंबई

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने शाळांंबाबत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी खबरदारी म्हणून मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा-महाविद्यालये 15 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याआधी 31 डिसेंबर 2020 पर्यंत सर्व शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्यात आले होते. मात्र, ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या अवताराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेने परिपत्रक जारी करत याबाबत माहिती दिली आहे. महापालिका क्षेत्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात असला तरीही जगभरातील इतर देशांमध्ये कोरोनाची आलेली दुसरी लाट आणि अन्य राज्यांतील करोनाची परिस्थिती पाहता महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालय 15 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.

कोरोनाच्या घातक अवताराची भारतात एन्ट्री

ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या घातक अवतारानं भारतामध्ये एन्ट्री केली आहे. देशातील 6 व्यक्तींच्या नमुन्यांमध्ये नव्या विषाणू आढळून आले आहेत. या सहा व्यक्ती ब्रिटनमधून भारतात परतले होते. देशातील वेगवेगळ्या ठिकाणी एकत्रित केलेल्या नमुन्यांमधून ही बाब स्पष्ट झाली आहे. बंगळुरुच्या NIMHANS मध्ये 3, हैदराबाद येथील CCMB प्रयोगशाळेत 2 आणि पुण्यातील राष्ट्रीय विषाणून संशोधन संस्थेकडे आलेल्या एका नमुन्यांमध्ये कोरोनाचा नवा अवतार आढळला आहे. कोरोना विषाणूचा नवा अवतार पहिल्या विषाणूपेक्षा 70 टक्के जादा घातक आहे.

 

मागे

रेशनपाणी, तेल, कपडे-चपला मिळणार मोफत, सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्यांसाठी उघडला मॉल
रेशनपाणी, तेल, कपडे-चपला मिळणार मोफत, सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्यांसाठी उघडला मॉल

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकर....

अधिक वाचा

पुढे  

Farmers Protest: मोदी सरकार आणि शेतकऱ्यांमधील निर्णायक चर्चेकडे साऱ्या देशाचे लक्ष
Farmers Protest: मोदी सरकार आणि शेतकऱ्यांमधील निर्णायक चर्चेकडे साऱ्या देशाचे लक्ष

कृषी कायदे रद्द (Farm laws) करण्याच्या मागणीसाठी गेल्या 34 दिवसांपासून दिल्लीच्या ....

Read more