ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईतील टीबी रुग्णालयाचा भोंगळ कारभार; कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह बाथरुममध्ये सापडल्यानं खळबळ

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 24, 2020 10:04 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईतील टीबी रुग्णालयाचा भोंगळ कारभार; कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह बाथरुममध्ये सापडल्यानं खळबळ

शहर : मुंबई

मुंबईतील शिवडी येथील टीबी रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टी. बी रुग्णालयातून बेपत्ता असलेल्या एका रुग्णाचा मृतदेह रुग्णालयाच्या बाथरुममध्येच सापडला आहे. सूर्यभान तेजबहादूर यादव (27) असे या रुग्णाचे नाव आहे. तो आरे कॉलनी परिसरात राहतो. या धक्कादायक प्रकारानंतर रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सूर्यभान यादव याला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्याला टीबी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. गेल्या 4 ऑक्टोबरपासून तो बेपत्ता होता. त्याची कोणतीही माहितीही न मिळाल्याने रुग्णालय प्रशासनाने तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात केली होती.

त्यानंतर पोलिसांनी तपास केल्यावर त्यांना 18 ऑक्टोबरला त्याचा मृतदेह हा बाथरुममध्ये सापडला. जवळपास 14 दिवसांपासून त्याचा मृतदेह हा बाथरुममध्येच पडून होता. मात्र तरीही याचा कोणालाही थांगपत्ता लागला नाही.

दरम्यान सूर्यभानचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने त्याचा मृत्यूचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही, असे सांगितले जात आहे. मात्र या प्रकारामुळे रुग्णालयाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. सूर्यभान यादव यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.

     

मागे

मुंबई विद्यापीठाचा बेजबाबदार कारभार, क्रीडा संकुलातून तीस वर्षे जुन्या ट्रॉफीज चोरीला!
मुंबई विद्यापीठाचा बेजबाबदार कारभार, क्रीडा संकुलातून तीस वर्षे जुन्या ट्रॉफीज चोरीला!

राज्यातील अनेक विद्यापीठांमध्ये सध्या ऑनलाईन परीक्षांबाबत गोंधळाचं वाता....

अधिक वाचा

पुढे  

नागपूर मेट्रोत 2500 कोटींचा घोटाळा, CBI आणि ED कडून चौकशी करा, राष्ट्रवादीची मागणी
नागपूर मेट्रोत 2500 कोटींचा घोटाळा, CBI आणि ED कडून चौकशी करा, राष्ट्रवादीची मागणी

ठनागपूर मेट्रोच्या 2500 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची CBI, ED द्वारे चौकशी करावी....

Read more