ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईत वाहनतळांलगत अनधिकृत पार्किंग केल्यास इतका दंड

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 19, 2019 07:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईत वाहनतळांलगत अनधिकृत पार्किंग केल्यास इतका दंड

शहर : मुंबई

मुंबई महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर आणि रस्त्यांलगत अनधिकृत 'पार्किंग' होत असल्याचे निदर्शनास आले असून त्यामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण होऊन वाहनांची गती मंदावत आहे. नागरिकांना आपली वाहने 'पार्क' करणे सुलभ व्हावे, यासाठी महापालिकेद्वारे विविध १४६ ठिकाणी तब्बल ३४ हजार ८०८ वाहने 'पार्क'करण्याची सुविधा उपलब्ध आहे. सध्या अनेक ठिकाणी वाहनतळांचा वापर करता जवळच्या रस्त्यांवर अनधिकृत पार्किंग केले जात आहे.

हे लक्षात घेऊन वाहनांच्या पार्किंगला शिस्त यावी आणि वाहतूक सुरळीत रहावी, याकरिता वाहनतळांलगतच्या एक किलोमीटरच्या रस्ता;तसेच दोन महत्त्वाच्या रस्त्यांना जोडणारे छोटे रस्ते हे 'नो पार्किंग झोन' म्हणून जाहीर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी प्रशासनाला दिले आहेत. याबाबत जनजागृती होण्यासाठी सूचना देणारे फलक लावण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. जुलैपासून याची अंमलबजावणी करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले असून 'नो पार्किंग झोन'मध्ये वाहन 'पार्क'केल्याचे आढळल्यास रुपये १० हजार दंड करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दंड भरल्यास वाहन'टोइंग मशीन'ने उचलून नेले जाणार आहे. अनधिकृत पार्किंगबाबत अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठी महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना कंत्राटदार नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित कंत्राटदारास माजी सैनिकांची नेमणूक करणे बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर यासाठी आवश्यक त्या प्रमाणात 'टोइंग मशीन' भाड्याने घेऊन वाहतूक पोलीसांना उपलब्ध करुन देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मागे

मेडीगड्डाचे लोकार्पण : तेलंगणाची विक्रमी कामगिरी, महाराष्ट्र कधी बोध घेणार?
मेडीगड्डाचे लोकार्पण : तेलंगणाची विक्रमी कामगिरी, महाराष्ट्र कधी बोध घेणार?

येत्या २१ जून रोजी देशाच्या सिंचन नकाशावर एका वेगळ्या विक्रमाची नोंद होणार....

अधिक वाचा

पुढे  

निसर्गाने दिला सतर्कतेचा इशारा, हिमालय पर्वताविषयीची धक्कादायक माहिती समोर
निसर्गाने दिला सतर्कतेचा इशारा, हिमालय पर्वताविषयीची धक्कादायक माहिती समोर

सूर्याचा दाह वाढू लागल्यानंतर बर्फाच्छादित पर्वतरांगांकडे सर्वांची पावल....

Read more