By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 21, 2020 11:05 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
येत्या २४ तासांत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी १२० मिमीपेक्षाही जास्त पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. याशिवाय, कोकणातही सर्वत्र पुढील २४ तास पाऊस सुरुच राहील, असेही कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.

Mumbai,Thane NM recd mod to hvy- wide spread RF in 24 hrs with 1,2 stns crossing 120 mm too. Latest radar/satellite images indicate very active monsoon ovr Konkan,more on N Konkan including Mumbai, Thane.Trend to cont nxt 24 hrs with interiors too.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 21, 2020
Greetings for Ganapati Festival pic.twitter.com/lwWtBTEwuQ
यापूर्वी ५ ऑगस्टला मुंबई झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्व यंत्रणा कोलमडून पडल्या होत्या. यावेळी ४ तासात ३३३ मिमी पाऊस झाला तर ७० ते ८० किमी प्रती तास व जास्तीत जास्त १०६ कि.मी प्रति तास वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबणे आणि झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या होत्या.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आता मुंबई पोलिसांच्या हाती काहीच उरलेलं नाही, ....
अधिक वाचा