By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 14, 2019 12:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : kalyan
सुप्रसिद्ध कॅरमपटू जान्हवी मोरे (18) हिचा अपघाती निधन झाले. रविवारी संध्याकाळी कल्याण-शिळ मार्गावरील लोढा बसस्टॉपवर पायी जात असताना जान्हवीला डोंबिवलीकडून येणार्या टँकरने जोरदार धडक दिली. त्यात ती गंभीर जखमी झाली आणि नंतर तिचा मृत्यू ओढवला.
जान्हवी मोरे बँक ऑफ इंडियाकडून शिष्यवृत्तीवर कॅरम खेळत होती. ती डोंबिवलीतील मॉडेल कॉलेजमध्ये एस.वाय. बी. कॉममध्ये शिकत होती. तिच्या घरी आई, वडील, तसेच हर्षल हा बारावीत शिकणारा लहान भाऊ असून वडील डिझाईन, पेंटिंगची कामे करतात. तर आई गृहिणी आहे. लोढा येथील स्मशानभूमीत जान्हवीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. टँकरचालक रोहिदास बटुळे याने जान्हवीला जखमी करण्यापूर्वी एका रिक्षाचालकाला धडक दिली होती. त्यातून वाचण्यासाठी तो भरधाव निघाला होता व त्याने जान्हवीला धडक दिली. अखेर त्याला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
तिहार जेलच्या 150 हिंदू कैद्यांनी यंदा रोजा ठेवला आहे. गेल्या वर्षीच्या तुलन....
अधिक वाचा