By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 19, 2019 10:43 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
विक्रोळमध्ये धान्याने भरलेला ट्रक पलटी झाल्याची घटना घडलीय. विक्रोळीच्या पार्कसाईट परिसरात झालेल्या या अपघातात चौघांचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झालाय. अश्विन हेवारे, विशाल शेलार, अब्दुल हमीद शेख, चंद्रशेखर मुसळे यांचा या अपघातात मृत्यू झालाय. तर चांद हसन शेख या जखमी व्यक्तीला घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आल असून त्यावर उपचार सुरू आहेत. विक्रोळीतील सुर्यानगर पोलीस ठाण्याजवळ गटाराचे काम सुरू होते. हे काम निकृष्ठ दर्जाचे असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले होते. या ठिकाणी कोणतीही दुर्घटना होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत होती. अखेर गुरूवारी रात्री या गटारात धान्याने एक ट्रक अडकला. काल रात्री साडेअकराच्या जवळपास धान्याने भरलेला ट्रक अचानक उलटला. त्याचवेळी त्याठिकाणी उपस्थित असेलले पाच जण ट्रक खाली आले त्यातच चौघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली असून घटनेची अपघाती नोंद करण्यात आलीय. तसेच, पोलीस याप्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.
भारत आणि पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात चालणारी व्यापारी वस्तुंची देवाणघे....
अधिक वाचा