ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ऑनलाईन परीक्षेच्या सर्व्हरवर सायबर हल्ला, मुंबई विद्यापीठाने आयडॉलच्या परीक्षा पुढे ढकलल्या

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 07, 2020 08:36 AM 2019-02-12T14:15:30+5:30

ऑनलाईन परीक्षेच्या सर्व्हरवर सायबर हल्ला, मुंबई विद्यापीठाने आयडॉलच्या परीक्षा पुढे ढकलल्या

शहर : मुंबई

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या तृतीय वर्ष बीकॉम व बीएच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेच्या सर्व्हरवर सायबर अटॅकने तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने दि. 6 ऑक्टोबर आणि दि. 7 ऑक्टोबर 2020 रोजी होणारे परीक्षेचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. (mumbai uni exam of distance and open students postponed due to cyber attack)

या परीक्षेच्या तारखा लवकरच ठरवून त्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर व आयडॉलच्या लिंकवर प्रदर्शित केल्या जाणार आहेत, अशी माहिती मुंबई विदयापीठाच्या उपकुलसचिवांनी दिली आहे.

ऑनलाईन परीक्षेच्या सर्व्हरवर सायबर अटॅक आढळला आहे. त्यादृष्टीने विद्यापीठ तक्रार नोंदविणार आहे. यामुळे या परीक्षांमध्ये ही तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे.

दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या अंतिम वर्षाच्या तृतीय वर्ष बीकॉम व बीएच्या परीक्षेस दि. 3 ऑक्टोबर 2020 पासून सुरुवात झाली. आज या परीक्षेचा दुसरा पेपर होता. तांत्रिक अडचणीमुळे आजचे हे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत.

तसेच उद्या दि. 7 ऑक्टोबर 2020 रोजी होणाऱ्या परीक्षा तृतीय वर्ष बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स, तृतीय वर्ष बीएस्सी आयटी सत्र 6 व बॅकलॉगच्या परीक्षा प्रथम व द्वितीय वर्ष बीए व बीकॉम, एमसीए सत्र 1 व सत्र २ या परीक्षाचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. दिनांक 6 व 7 ऑक्टोबर 2020 रोजीच्या या परीक्षांच्या नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.

मागे

Weather Alert: राज्यात परतीच्या पावसाची हजेरी, या भागांत मुसळधार ते मध्यम सरी कोसळणार
Weather Alert: राज्यात परतीच्या पावसाची हजेरी, या भागांत मुसळधार ते मध्यम सरी कोसळणार

यंदा संपूर्ण राज्याला मुसळधार पावसाने चांगलंच झोडपून काठलं. अनेक ठिकाणी पू....

अधिक वाचा

पुढे  

साखर संघ आणि ऊस तोडणी संघटनांच्या सरकारकडे 'या' मागण्या
साखर संघ आणि ऊस तोडणी संघटनांच्या सरकारकडे 'या' मागण्या

उस तोडणीसाठी ४०० रुपये प्रति टन मजुरी मिळावी तसेच सध्या महाराष्ट्रात मिळणा....

Read more