ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंगला ईडीकडून पुन्हा चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 30, 2020 10:05 AM 2019-02-12T14:15:30+5:30

आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंगला ईडीकडून पुन्हा चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता

शहर : मुंबई

टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांना आज अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीकडून पुन्हा चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात ईडीच्या अधिकाऱ्यांनी प्रताप सरनाईक यांच्या घरावर छापे टाकले होते. त्यावेळी विहंग सरनाईक यांना ईडी कार्यालयात घेऊन जात 4 तास चौकशीही केली होती. त्यानंतर विहंग यांना चौकशीसाठी पुन्हा बोलावण्यात आलं. पण ते ईडीसमोर हजर झाले नाहीत.  

विहंग सरनाईक यांना ईडीनं दोन वेळा समन्स बजावलं आहे. मात्र ते चौकशीला हजर झाले नाहीत. त्यामुळे आज पुन्हा एकदा त्यांना ईडीकडून चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता आहे. ही चौकशी टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अमित चांदोळेंना तीन दिवसाची कोठडी

टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी 25 नोव्हेंबरला अमित चांदोळे यांची ईडीने कसून चौकशी केली होती. त्यानंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. 26 नोव्हेंबरला सकाळी ईडीने चांदोळे यांना कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने चांदोळे यांना तीन दिवसाची कोठडी सुनावली आहे. चांदोळे यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील ही अत्यंत महत्त्वाची चौकशी मानली जात चांदोळे यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ईडी पुढील सूत्रे हलवणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

ईडीची सरनाईकांच्या घर, कार्यालयावर छापेमारी

दरम्यान, ईडीने 24 नोव्हेंबर रोजी प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली होती. ईडीने सरनाईक यांच्या घर, कार्यालय आणि हॉटेलसह 10 ठिकाणांवर छापे मारले होते. त्यावेळी सरनाईक मुंबईत नव्हते. ते भारताबाहेर होते. मात्र, ईडीचे छापे पडल्याचं कळताच ते भारतात आले आणि त्यांनी तडक प्रभादेवीतीलसामना कार्यालयात जाऊन शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली. तब्बल दीड तास या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर बोलताना ईडीने कारवाई का केली? कशासाठी केली? याची काहीच कल्पना नसल्याचं सरनाईक यांनी सांगितलं होतं.

मागे

'अर्णब गोस्वामींना जामीन न देणं ही उच्च न्यायालयाची चूक'
'अर्णब गोस्वामींना जामीन न देणं ही उच्च न्यायालयाची चूक'

इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांची आई कुसुम नाईक यांच्या आत्महत्ये ....

अधिक वाचा

पुढे  

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या लोटेतील मालमत्तेचा 1 डिसेंबरला लिलाव
अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या लोटेतील मालमत्तेचा 1 डिसेंबरला लिलाव

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या लोटे येथील मालमत्तेच्या लिलावाची संपूर्....

Read more