ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईत नऊ वॉर्ड अतिगंभीर, 'जी दक्षिण'मध्ये एका दिवसात 52 नवे कोरोनाग्रस्त

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 16, 2020 05:03 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईत नऊ वॉर्ड अतिगंभीर, 'जी दक्षिण'मध्ये एका दिवसात 52 नवे कोरोनाग्रस्त

शहर : मुंबई

मुंबईतील ‘कोरोनाग्रस्तांचा आकडा 1,753 वर गेल्यामुळे धाकधूक वाढली आहे. नव्या निकषानुसार मुंबईतील अतिगंभीर वॉर्डची संख्या एका दिवसात पाचवरुन नऊवर गेली आहे. ‘जी दक्षिण प्रभागात एका दिवसात 50 पेक्षा अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. (Mumbai Ward wise Corona Patients)

मुंबईत 14 एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार 1,753 कोरोनाग्रस्त असून ‘जी दक्षिणमध्ये सर्वाधिक म्हणजे 360 रुग्ण आहेत. कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या 85 पेक्षा अधिक गेल्यास तो ‘अतिगंभीर विभाग मानला जातो. त्यानुसार, जी दक्षिण, ई, डी, जी उत्तर, एच पूर्व, एम पूर्व, के पूर्व, के पश्चिम आणि एल हे नऊ वॉर्ड अतिगंभीर ठरतात.

50 ते 84 रुग्णसंख्या असलेल्या विभागास ‘गंभीर समजले जाणार आहे. यामध्ये दक्षिण, एम पश्चिम, एफ उत्तर आणि पी उत्तर हे चार वॉर्ड येतात.

जी दक्षिण प्रभागात एका दिवसात तब्बल 52 नवे रुग्ण सापडले आहेत. तर ‘डी वॉर्डमध्ये 23 नवे रुग्ण आढळले आहेत. चार प्रभागांमध्ये कालच्या दिवसात एकही रुग्ण सापडलेला नाही, ही काहीशी दिलासादायक बाब.

अतिगंभीर वॉर्ड- रुग्णसंख्या

जी दक्षिण – वरळी, लोअर परळ, करी रोड – 360

ई – भायखळा, रे रोड, सुखलाजी स्ट्रीट, वाडीबंदर – 125

डी – मलबार हिल, वाळकेश्वर, ग्रँट रोड, ब्रिच कँडी, हाजी अली – 130

जी उत्तर – माहिम, धारावी, शिवाजी पार्क – 97

एच पूर्व – वांद्रे पूर्व कलानगर, सरकारी वसाहत, खार पूर्व, सांताक्रुझ पूर्व – 96

एम पूर्व – गोवंडी, मानखुर्द, देवनार, चेंबूर, शिवाजीनगर – 95

के पूर्व – जोगेश्वरी पूर्व, अंधेरी पूर्व, विलेपार्ले पूर्व – 90

के पश्चिम – अंधेरी, जोगेश्वरी, जुहू, वर्सोवा 88

एल – चुनाभट्टी, कुर्ला – 85

कुठे किती रुग्ण? (कंसात एका दिवसातील वाढ)

जी दक्षिण – 360 (+52)

ई – 135 (+10)

डी – 130 (+23)

जी उत्तर – 97 (+14)

एच पूर्व – 96 (+11)

एम पूर्व – 95 (+9)

के पूर्व – 90 (+7)

के पश्चिम – 88 (+8)

एल – 85 (+4)

दक्षिण – 67 (+15)

एम पश्चिम – 62 (+7)

एफ उत्तर – 58 (+4)

पी उत्तर – 57 (+3)

बी –47 (+17)

एफ दक्षिण – 41 (0)

ए – 39 (+12)

उत्तर – 38 (+2)

आर दक्षिण – 36 (0)

एच पश्चिम – 36 (+2)

पी दक्षिण – 34 (+1)

आर मध्य – 26 (0)

आर उत्तर – 13 (0)

मध्य – 13 (+2)

टी – 11 (+2)

 

मागे

देशात कोरोनाचे १७० जिल्हे हॉटस्पॉट; मात्र कम्युनिटी ट्रान्समिशन नाही - आरोग्य मंत्रालय
देशात कोरोनाचे १७० जिल्हे हॉटस्पॉट; मात्र कम्युनिटी ट्रान्समिशन नाही - आरोग्य मंत्रालय

देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत व....

अधिक वाचा

पुढे  

मुंबई-पुण्यातली दुकानं उघडायला या अटींसह परवानगी
मुंबई-पुण्यातली दुकानं उघडायला या अटींसह परवानगी

लॉकडाऊनमध्ये रेड झोनमधली दुकानं उघडण्याला राज्य सरकारने अटींसह परवानगी द....

Read more