By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 08, 2019 12:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महानगर पालिके तर्फे पवई येथील 1 हजार 800 मिमी व्यासाच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे आणि धारावी येथील माहीम फाटकाजवळील 1 हजार 800 मिमी व्यासाच्या वैतरणा, अप्पर वैतरणा जलवाहिनी खंडित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी 9 व 10 जुलै रोजी अंधेरी पूर्व,वांद्रे पूर्व आणि धारावी परिसरात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. दुरुस्तीचे काम उद्या 9 जुलै रोजी दुपारी 12 वाजल्यापासून 10 जुलै रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत असे 24 तास सुरू राहणार आहे.
या कामामुळे के पूर्व विभागात छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एयरपोर्ट, एम . आय. डी.सी. ट्रान्स रेसिडेंसी , सुभाषनगर, सरीपुत नगर, विजयनगर, पोलिस कॅम्प ,मरोळ गावठाण, मिलिटरी रोड, भवानी नगर, चिमट पडा, सगबाग ,मकवाणा रोड, ओंमनगर ,सहर गाव, प्रकाश वाडी , गोविंद वाडी इस्लाम पुरा, पारसीवाडा, चकाला गावठाण, जे.बी.नगर, मुळागाव डोंगरी, बामण वाडा ,कबीर नगर, लेले वाडी, टेक्निकल एरिया, तरुण भारत सोसायटी, एयरपोर्ट परिसर, जी,उत्तर विभागात (सायंकाळी 4 ते 9 या वेळेतील पाणी पुरवठा बंद) धारावी, धारावी मैन रोड , गणेश मंदिर रोड , ए.के.जी. नगर रोड,कुंभार वाडा संत गोरा कुंभार रोड , दिलीप कदम मार्ग तर प्रेम नगर, नाईक नगर, 60 फीट रोड, जैस्मिन मिल रोड, माटुंगा लेबर कंप , 90 फुट रोड, एम. जी.रोड, संत रोहिदास मार्ग ,आदि भागात सकाळी 4 ते दुपारी 12 या वेळेतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झाला. स्विफ्ट कार आणि ट्रकची टक्कर....
अधिक वाचा