By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 15, 2019 05:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
ठाण्यात घरी न सांगता खाडीत पोहण्यासाठी गेलेले शुभम देवकर (वय 15) व प्रवीण कंचारी (वय 15) हे दोघे मिठबंदर रोड येथील विसर्जन घाटावर बुडाले. तर दुसर्या एका घटनेत मुंबईत आकसा बीच वर बाबू द्रविड(वय 22) या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. मात्र विघ्नेश दास द्रविड (वय 21) विशाल द्रविड यांना पर्यटकानी वाचवले. हे तिघेही कांदिवली पूर्व येथील शास्त्री चाळ अन्नानगर मधील रहिवासी आहेत.
कोपरी येथील महाविद्यालयतील 11 विचा प्रवेशाचा अर्ज भरून शुभम देवकर व प्रवीण कचारी पोहायला गेले. रात्री उशिरा पर्यंत ते घरी पोहचलेच नाहीत. त्यामुळे त्याचा शोध घेतला व पोलिसात तक्रार देण्यात आली तेव्हा तपास करताना खाडी किनार्यावर कपडे मिळाले. त्यानतर पालिका आपती व्यवस्थापन पथक आणि पोलिसांनी या दोघांचा खाडीत शोध सुरू केला असतं त्या दोघांचे मृतदेह सापडले. या आधीही एका विद्यार्थ्याचा पाय घसरून येथे मृत्यू झाला होता.
सूरत बलात्कार प्रकरणी आसाराम बापुला जमीन देण्याची मागणी न्यायालयाने पुन्....
अधिक वाचा