By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 01, 2020 08:05 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई महापालिका क्षेत्रात येत्या 5 ऑगस्टपासून पाणी कपात करण्यात येणार आहे. यानुसार मुंबईत 20 टक्के पाणी कपात केली जाणार आहे. कमी पावसामुळे पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचा आवाहन पालिका प्रशासनाने घेतला आहे. यंदा पावसाळ्यामध्ये जून आणि जुलै महिन्यात मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात फक्त 34 टक्के पाण्याचा साठा उपलब्ध आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्यात 85.68 टक्के आणि 2018 च्या जुलैमध्ये 83.30 टक्के जलसाठा होता.हीच परिस्थिती यापुढेही राहिल्यास पावसाळा संपल्यानंतरही पालिकेकडे पुरेसा जलसाठा उपलब्ध होऊ शकणार नाही. मुंबईचा पाणीपुरवठा 31 जुलै 2021 पर्यंत सुरळीपणे चालू ठेवण्यासाठी पाणी पुरवठ्यात 5 ऑगस्टपर्यंत 20 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.ही पाणीकपात मुंबई महापालिकेतर्फे पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या ठाणे, भिवंडी महानगरपालिका आणि इतर गावांनासुद्धा लागू राहील. तरी सर्व नागरिकांनी या कालावधीत पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
कर्ज देऊन छोट्या देशांना लूटणारा चीन, कपटानं इतरांच्या (China J15 Fighter Aircraft) जमिनी बळ....
अधिक वाचा