By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 10, 2020 02:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राज्यात काल दिवसभरात २५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर एकट्या पुण्यात १४ बळी गेले आहेत. राज्यातला मृतांचा आकडा ९७वर तर निम्म्याहून अधिक रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत. काल एका दिवसात २२९ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळं राज्यातील करोनाबाधितांची संख्या १३६४ वर जाऊन पोहोचली आहे. मुंबईतील चिंताजनक स्थिती पाहून लॉकडाऊन अधिक कठोर करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून त्यासाठी करोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या भागात राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत.
मुंबईतील परिस्थिती हाताबाहेर जावू नये म्हणून मुंबईसह एमएमआर आणि पुणे विभागात लॉकडाऊन वाढवून अधिक कठोर करणार असल्याची माहिती, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची झी २४ तासला दिली. लोकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी आणखी कडक उपाय राबवणार आहोत, असेही ते म्हणालेत.
धारावीत संख्या वाढतेय
आज दादर येथे दोन नर्स पाठोपाठ आणखी एक रुग्ण वाढला आहे. एन सी केळकर मार्गावरील ८३ वर्षीय वृद्ध व्यक्तीस कोरोनाची लागण झाली आहे. दादरमध्ये आता कोरोनाचे एकूण रुग्णसंख्या सहावर पोहोचली आहे. तर धारावीत कोरोनाचे संकट वाढत चालले आहे. रात्रीत आणखी ५ रुग्ण वाढले आहेत. धारावीत कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली २२ वर पोहोचली आहे. या पाच रुग्णांपैकी दोघेजण हे दिल्ली निजामुद्दीन इथं गेलेले होते. त्यांना राजीव गांधी स्पोर्टस कॉम्प्लेक्स इथे क्वारंटाईन करून ठेवले होते. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आता त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. एक बालिगानगर समोरील आहे तर दुसरा पीएमजीपी कॉलनी येथील आहे.
कोरोना व्हायरसने देशभरात थैमान घातलं आहे. त्यातच आता संपूर्ण देशात सुरू अस....
अधिक वाचा