By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 22, 2020 10:33 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
बिहारमध्ये एका सात वर्षाच्या मुलाचे अपहरण करुन त्याच्या कुटुंबीयांकडे मुंबईवरुन 20 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला कांदिवली पोलिसांनी अटक केली असून त्याला बिहार पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. रियासुद्दीन अन्सारी असे या आरोपीचे नाव असून त्याच्यासह बिहार पोलिसांनी बिहारमध्ये खान मुहंमद अन्सारी, अलाउद्दिन अन्सारी आणि मुस्लिम अन्सारी या आणखी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 14 ऑक्टोबर रोजी बिहारच्या चंपारण्यमधल्या धनहा इथे सात वर्षाच्या मुबारक अन्सारी या मुलाचे अपहरण झाले होते. त्यानंतर त्याच्या कुटुंबाकडे 20 लाख रुपये खंडणी मागण्यात आली होती. ही खंडणी मागण्यासाठी आलेला फोन हा कांदिवली विभागातून आला होता. यामुळे बिहार पोलिसांनी कांदिवली पोलिसांना याची माहिती देऊन मदत मागितली होती. यानंतर कांदिवली पोलिसांनी तात्काळ आरोपी रियासुद्दीन अन्सारीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आणि बिहार पोलिसांच्या हवाली केले.
मुंबई पोलिसांच्या मदतीमुळे बिहार पोलिसांना उर्वरित आरोपी आणि त्या मुलाचाही छडा लागला. मुलाला शोधून सुखरुप त्याच्या कुटुंबीयांकडे देण्यात आले. बिहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित आरोपी हे कर्जबाजारी झाले होते. त्यांना पैशाची गरज होती. त्यामुळे त्यांनी ही गुन्हा केला होता.
याआधी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलीस विरुद्ध बिहार पोलीस असा सामना रंगला होता. बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी मुंबई पोलिसांवर सडकून टीका होती. मात्र एका मुलाच्या अपहरण प्रकरणात मुंबई पोलीस बिहार पोलिसांच्या मदतीला धावून आले. मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यांच्या एकत्रित कामगिरीमुळे एक मुलगा सुखरुप त्यांच्या कुटुंबाला मिळाला आणि आरोपी देखील गजाआड झाले.
कोरोना लसीच्या चाचणीचे प्रयोग जगभरात सुरु जात आहेत. अशात ब्राझीलमध्ये (Brazil) क....
अधिक वाचा