By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 17, 2019 04:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई – गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्तीसाठी ‘हद्दीत वादा’त अडकलेले 11 धोकादायक पूल मुंबई महानगरपालिका लवकरच नव्याने बांधणार आहे. तसेच या सर्व पुलांचा खर्च पालिका करणार असून महाराष्ट्र रेल इनफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट कार्पोरेशन लि. कडून पूल बांधून घेणार आहे.
दादर येथील बहुचर्चित टिळक ब्रिजसह रेल्वे लाईनवरील 11 पूल आणि एक भुयारी मार्गाचा समावेश आहे व यासाठी पालिकेची मंजूरी मिळाली आहे. गेल्या वर्षातील अंधेरी आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील पूल कोसळल्या नंतर पालिकेच्या मध्यमातून शहर आणि पूर्व- पश्चिम उपनगरातील पूलांची दुरूस्ती आणि काही ठिकाणी नवी पूल बांधण्याल येणार आहेत. तसेच रेल्वे लाईनच्या वरील आणि खालील पुलांची कामे धोकादायक असल्याने नव्याने बांधण्याचे काम हाती घेतले जाईल.
रेल्वे लाइनवरील पुलांमध्ये भायकळा रेल्वे लाइनवरील पूल, ओलीवंट रेल्वे लाईनवरील पूल, आर्थर रोड रेल्वे लाइनवरील पूल, गार्डन रेल्वे लाइनवरील पूल, रे रोड रेल्वे लाइनवरील पूल, करी रोड रेल्वे लाइनवरील पूल, घाटकोपर रेल्वे लाइनवरील पूल, बेलसिस रेल्वे लाइनवरील पूल, महालक्ष्मी रेल्वे लाइनवरील पूल, दादरच्या टिळक पुलासह ना. म. जोशी मार्ग डी. पी. रोड मध्य रेल्वेवरील पूल तसेच माटुंगा लेबर कॅम्पजवळील हार्बर लाईलखालील वाहतूक भुयारी मार्गाचा समावेश आहे.
यामध्ये पालिका एम ‘आरआयडीसीएल’ ला एकूण प्रकल्प खर्चाच्या 11 टक्के व्यवस्थापन शुल्क, अधिक रेल्वे प्रशसनाला रेल्वेच्या हद्दीतून पुलांच्या कामाच्या प्रकल्प खर्चाच्या 8.25 टक्के पर्यवेक्षन शुल्क द्यावे लागणार आहे. यासाठी स्वातंत्र करार करण्यासाठी स्थायी समितीच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.
प्रतींनिधी- अनुज केसरकर -: स्वयंसिद्धा प्रतिष्ठानच्या वतीने एक दिवसीय राज्....
अधिक वाचा