By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 03, 2019 05:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
हिंजवडी येथे किरकोळ भांडणानंतर एका कामगाराचा गळा दाबून खून केल्याची घटना म्हाळूंगे चौकाजवळील पुराणिक कॅम्प येथे गुरुवारी रात्री घडली. रविंद्र साहू (26) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविंद्र हा मूळचा झारखंडचा असू तो कामानिमित्त पुण्यात आला होता. म्हाळुंगे चौकाजवळ एका इमारतीचे बांधकाम सुरु आहे. त्या साईटच्या लेबर कॅम्पमध्ये रविंद्र राहत होता. गुरुवारी त्याचे त्यांच्या सहकार्यांशी भांडण झाले होते. त्यानंतर टॉवेलच्या सहाय्याने गळा आवळून रविंद्र याचा खून करण्यात आला. शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला असून हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये पांढर्या वाघाने सर्वांच....
अधिक वाचा