ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंढेंचा दणका; कर्तव्यात कसूर करणाऱ्या नऊ कर्मचाऱ्यांचे निलंबन

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 25, 2020 12:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंढेंचा दणका; कर्तव्यात कसूर करणाऱ्या नऊ कर्मचाऱ्यांचे निलंबन

शहर : नागपूर

लोकप्रतिनिधींशी सुरु असलेल्या वादामुळे चर्चेत असलेले नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी कामचुकार कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका दिला. काल सकाळी सहा वाजता तुकाराम मुंढे अचानकपणे महानगरपालिकेच्या मुख्यालयात हजर झाले. मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागूनच कोरोना नियंत्रण कक्ष आहे. हा कक्ष २४ तास सुरू असतो. येथे कर्मचाऱ्यांना पाळीमध्ये बोलाविण्यात येते. मात्र रात्रपाळीत असलेले चार कर्मचारी त्यांना नेमून दिलेली जबाबदारी व्यवस्थीतपणे पार पडत नसल्याचे निर्दशनास आले. कर्तव्यात कसूर केलेल्या किशोर कहाते, मनोज तांगडे, प्रशांत डाहाळ, सुनील लोहकरे यांना तात्काळ प्रभावाने आयुक्तांनी निलंबित केले.

यानंतर तुकाराम मुंढे यांनी अटलबिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटरला भेट दिली. तेथून शहरात प्रत्येक झोनमधील सफाई कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले की नाही, याची पाहणी केली. मनपा आयुक्तांनी अचानकपणे विविध झोनमधील स्वच्छता निरीक्षकांना फोन लावून उलटतपासणी केली. कोण कुठे आहेत, ते लोकेशन तपासले. यानंतर तेथून पाचपावली, इंदोरा, धरमपेठ अशा काही ठिकाणी हजेरी शेडला भेट दिली. तेथील हजेरी रजिस्टरची तपासणी केली. तेथेही काही स्वच्छता निरीक्षक अन्य कर्मचारी कर्तव्यात कसूर करताना आढळले. त्यांनाही तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये आशीनगर झोन क्रमांक ९चे स्वच्छता निरीक्षक संजय पोटे, आशिक बनसोड, धरमपेठ झोनचे प्रभारी झोनल आरोग्य अधिकारी जयवंत जाधव, नेहरूनगर झोन क्रमांक चे राजेंद्र सोनटक्के आणि मंगळवारी झोन क्रमांक १० चे दिनेश करोसिया यांचा समावेश आहे.

 

मागे

अर्थव्यवस्थेबरोबरच आरोग्य अधिक महत्वाचे आहे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
अर्थव्यवस्थेबरोबरच आरोग्य अधिक महत्वाचे आहे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक गोष्टी....

अधिक वाचा

पुढे  

मुंबई सेंट्रलमध्ये  एकाच सोसायटीत 55 रुग्ण आढळल्याने खळबळ
मुंबई सेंट्रलमध्ये एकाच सोसायटीत 55 रुग्ण आढळल्याने खळबळ

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने मुंबईला जेरीस आणल्याचं दिसत आहे. आता नव....

Read more