By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 28, 2020 09:31 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : नागपूर
नागपुरात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. नागपूर जिल्ह्यात कोरोनाची सध्या भयावह स्थिती निर्माण झाली आहे. दोन दिवसात 90 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर कोरोनाचे 2500 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यात एकीकडे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे, तर दुसरीकडे रुग्णांना रुग्णालयात बेड मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. खाजगी रुग्णालयात बेड मिळत नसल्याने रुग्ण दगावत आहेत.
एका व्यावसायिकाला खासगी रुग्णालयात बेड न मिळाल्याने कारमध्येच त्याचा मृत्यू झाला आहे. उपचाराच्या प्रतीक्षेत नागपुरात लोकांचा जीव जात असल्याचे समोर आलं आहे. शहरातील परिस्थिती हाताबाहेर गेल्याने कडक लॉकडाऊनची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. कोरोनाच्या भयावह स्थितीमुळे लॉकडाऊनच्या मागणीत वाढ होत आहे.
दरम्यान, नागपुरात रुग्ण संख्या वाढत असल्याने डॉक्टरांनाही आता कोरोनाची लागण होत आहे. नागपुरात 65 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. नुकतेच नागपुरातील मेयो रुग्णालयात 31 डॉक्टरांना कोरोना झाल्याचे समोर आले.
नागपुरातील रिकव्हरी रेट घटला, आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली
नागपुरातील कोरोना रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण घटलं आहे. रिकव्हरी रेट घटून 47.11 टक्क्यांवर गेला आहे. हा रेट 31 मे रोजी 71.47 टक्के होता. पण त्यात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाची चिंता वाढली आहे.
गलवान खोऱ्यातील भारत आणि चीन यांच्यातील संघर्षानंतर मोदी सरकारने उचलले....
अधिक वाचा