ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नागपूर पदवीधर निवडणूक : 19 उमेदवारांमध्ये रंगणार सामना, 7 जणांनी अर्ज घेतले मागे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 18, 2020 10:41 AM 2019-02-12T14:15:30+5:30

नागपूर पदवीधर निवडणूक : 19 उमेदवारांमध्ये रंगणार सामना, 7 जणांनी अर्ज घेतले मागे

शहर : नागपूर

नागपूर पदवीधर मतदार संघात आता 19 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. कारण अखेरच्या दिवशी सात जणांचे अर्ज मागे घेण्यात आले आहे. नागपूरसाठी एकूण 31 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते त्यापैकी 5 अर्ज अपात्र ठरले तर सात जणांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. यामध्ये मुख्य लढतीत भाजपचे संदीप जोशी तर महाविकास आघाडीचे अभिजित वंजारी असतील तर इतर उमेदवारसुद्धा महत्वाची भूमिका निभावणार आहेत. खरंतर, नागपूर पदवीधर मतदार संघाचे क्षेत्र मोठे असल्याने प्रचार करताना उमेदवारांची दमछाक होणार आहे. त्यात आता निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणंदेखील महत्त्वाचं आहे.

या निवडणुकीसाठी 31 उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरण्यात आले त्यामध्ये अविनाश तुपकर, प्रशांत डवले, रमेश फुले, धर्मेंद्र मंडलिक आणि अभिजित रविंद वंजारी (अपक्ष उमेदवार) यांचा समावेश आहे. यंदाच्या निवडणुकीत दोन अभिजीत वंजारी नावाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी अपक्ष उमेदवार अभिजित रविंद वंजारी यांचा अर्ज अपात्र ठरवण्यात आला आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघातून निवडणुकीत एकूण 31 उमेदवार रिंगणात उतरले होते. भाजपचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघात यंदा भाजपने उमेदवार बदलत महापौर संदीप जोशी यांना संधी दिली. तर काँग्रेसकडून अभिजीत वंजारी यांना मैदानात उतरवण्यात आलं.

दरम्यान, निवडणुकीच्या रिंगणात संदीप दिवाकर जोशी आणि संदीप रमेश जोशी अशा नावाचे 2, तर अभिजीत गो. वंजारी आणि अभिजीत रविंद्र वंजारी अशा नावाचे 2 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी अभिजीत रविंद्र वंजारी यांचा अर्ज अपात्र ठरला होता.

निवडणुकीचा कार्यक्रम

निवडणूक जाहीर : 5 नोव्हेंबर

उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस : 12 नोव्हेंबर

अर्ज छाननी : 13 नोव्हेंबर

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस : 17 नोव्हेंबर

मतदानाचा दिनांक : 1 डिसेंबर मतदान (सकाळी 8 ते सांयकाळी 5)

मतमोजणी : 3 डिसेंबर

निवडणूक प्रक्रिया संपण्याचा दिवस : 7 डिसेंबर

मागे

मुंबईकर तरुणांनो, मतदार यादीत नाव नोंदवा, मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर
मुंबईकर तरुणांनो, मतदार यादीत नाव नोंदवा, मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

मुंबईत मतदार यादीचा पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर झाला आहे. भारत निवडणूक आयोगा....

अधिक वाचा

पुढे  

हरियाणात कोरोनाचा कहर!, 8 शाळांमधील 80 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, आरोग्य विभागात खळबळ
हरियाणात कोरोनाचा कहर!, 8 शाळांमधील 80 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, आरोग्य विभागात खळबळ

महाराष्ट्रासह देशातील काही राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याची....

Read more