ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

तुकाराम मुंढे असताना लॉकडाऊनला विरोध, आता महापौरांकडून नागपुरात लॉकडाऊनची मागणी

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 25, 2020 09:41 AM 2019-02-12T14:15:30+5:30

तुकाराम मुंढे असताना लॉकडाऊनला विरोध, आता महापौरांकडून नागपुरात लॉकडाऊनची मागणी

शहर : नागपूर

तुकाराम मुंढे असताना लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या भाजपकडून आता नागपुरात लॉकडाऊनची मागणी करण्यात येत आहे. नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी शहरात कडक लॉकडाऊन करण्याची मागणी केली आहे .कोरोना नियंत्रणासाठी महापौरांनी पालकमंत्र्यांकडे लॉकडाऊनची मागणी केली आहे. नागपूरातील कोरोना स्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. रोज सरासरी 50 च्या आसपास कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे.कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी शहरात लॉकडाऊनची गरज असल्याने शहरात लॉकडाऊन करण्याची मागणी महापौरांनी केली आहे. महापौरांसह सर्वसामान्य नागरिकांचीनी नागपुरात लॉकडाऊनची मागणी केली आहे.

नागपुरात 71,616 कोरोना रुग्ण

नागपुरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाचली आहे. सध्या नागपुरात 71 हजार 616 कोरोना रुग्ण आहेत. यापैकी 53 हजार 418 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, आतापर्यंत 2261 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. नागपुरातील कोरोनाचा मृत्यूदर हा 2.87 टक्के आहे. तर रिकव्हरी रेट 74.59 टक्के आहे. तसेच, कोरोना डबलिंग रेट 29.1 दिवस इतका आहे.

नागपुरातरेमडेसिवीरचा मोठा तुटवडा

नागपुरातरेमडेसिवीरचा मोठा तुटवडा उद्भवला आहे. ‘रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची पायपीट होत आहे. या इंजेक्शनची जास्त दराने विक्री होत असल्याच्या नातेवाईकांच्या तक्रारी आहेत. मेडिकल आणि मयो या सरकारी रुग्णालयांमध्येहीरेमडेसिवीरचा तुटवडा आहे. त्यामुळे नागपुरात कोरोना रुग्णांना ना वेळेवर उपचार मिळत आहेत नाही औषधं अशी स्थिती आहे.

 

 

मागे

पुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती
पुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती

पुण्यात आजपासून सायंकाळी 7 नंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार आहे, अशी माहि....

अधिक वाचा

पुढे  

ड्रग्ज प्रकरण : चॅट लीकवरील प्रश्नांवर व्हॉट्सअॅपनं दिलं स्पष्टीकरण
ड्रग्ज प्रकरण : चॅट लीकवरील प्रश्नांवर व्हॉट्सअॅपनं दिलं स्पष्टीकरण

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी सुरू असलेल्या तपासादरम्य....

Read more