By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 02, 2020 11:46 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : नागपूर
नागपूर महापालिका हॉस्पिटलला आलेली उकिरड्याची अवकळा पाहून महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा चांगलाच संताप झाला. काम करायचं नसेल तर घरी जा, असा सक्त इशारा मुंढे यांनी डॉक्टरांना दिला. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा क्लास घेतला. ‘नागपूर महापालिकेचं सर्वात चांगलं रुग्णालय उकिरड्यासारखं झालं आहे, हे खपवून घेणार नाही’ अशी ताकीद तुकाराम मुंढे यांनी दिली.
‘महापालिकेचे काही डॉक्टर नीट प्रॅक्टिस करत नाही, ज्यांना जमत नसेल त्यांनी घरी जावं’ अशा शब्दात तुकाराम मुंढे यांनी वॉर रुममध्येच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना झापलं.
प्रशासनातली गोपनीय माहिती बाहेर पडते, यावरही मुंढे यांनी नाराजी व्यक्त केली. ‘कोरोना’शी लढण्यासाठी महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज करण्याचे आदेश तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
नागपुरात ‘कोरोना’ रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन होत नसल्याने प्रशासकीय यंत्रणा करत असलेल्या प्रयत्नांना यश येत नाही. यापुढे नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन केले नाही, तर भविष्यात गंभीर स्थितीला सामोरे जावे लागेल, असा इशारा तुकाराम मुंढे यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता.
लॉकडाऊनदरम्यान सर्व सुविधा घरपोच मिळण्याची व्यवस्था महापालिका प्रशासनाने केली आहे. त्यामुळे लोकांनी घरीच राहावे. कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करावी, असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी सोशल मीडियावरील एका व्हिडिओद्वारे केले आहे.
विशेष म्हणजे नागरिक गर्दी करत असल्यामुळे कॉटन मार्केट पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले आहे. भाजी घेऊन नागपुरात येणारी वाहने आता कॉटन मार्केटमध्ये न पाठवता शहरातील विविध भागात पाठवण्यात येतील. यामुळे एकाच ठिकाणी होणारी गर्दी विभागली जाईल, असेही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील ‘कोरोना’ग्रस्त रुग्णांमध्ये तीनने वाढ झाल्यामुळे राज्....
अधिक वाचा