By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 14, 2020 11:09 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : नागपूर
पाकिस्तानने (Pakistan) शुक्रवारी (13 नोव्हेंबर) केलेल्या गोळीबारात महाराष्ट्राच्या आणखी एका जवानाला वीरमरण आलं आहे. पाकिस्तानी सैनिकांशी झालेल्या चकमकीत नागपूर (Nagpur) जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील भूषण सताई हे जवान शहीद झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ते मराठा बटालियनमध्ये नायक पदावर तैनात होते. ऐन दिवाळीत दोन जवानांना वीरमरण आल्याने महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भूषण सताई हे श्रीनगरच्या गुरेज सेक्टरमध्ये तैनात होते. पाकिस्तानने शुक्रवारी शस्त्रसंधीचं उल्लंघन करून भारताच्या दिशेला बेछूट गोळीबार केला. पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र, यामध्ये दोन जवानांना वीरमरण आलं. कोल्हापुरच्या आजरा तालुक्यातील बहिरेवाडी गावाचे सुपुत्र ऋषिकेश जोंधळे हेदेखील या गोळीबारात शहीद झाले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, भूषण सताई हे अवघे 28 वर्षांचे होते. ते 2011 मध्ये सैन्यात भर्ती झाले होते. त्यांच्या अशा अकाली जाण्यामुळे काटोलमध्ये शोककळा पसरली असून 12 वाजता भूषण यांचं पार्थिव त्यांच्या मूळगावी आणलं जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, कोल्हापुरच्या आजरा तालुक्यातील बहिरेवाडी गावाचे सुपुत्र ऋषिकेश जोंधळे हेदेखील या गोळीबारात शहीद झाले आहेत. पाक सैन्याकडून शुक्रवारी पहाटेपासूनच वारंवार शस्त्रीसंधीचं उल्लंघन केलं जात होतं. पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबाराला उत्तर देताना ऋषिकेश गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराठी हेलिकॉप्टरमधून सैन्याच्या दावाखान्यात नेत असताना त्यांचं निधन झालं.
पाकिस्तानकडून सीमाभागात वारंवार गोळीबार सुरु होता. भारतीय जवानांनीदेखील त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र, या गोळीबारात अवघ्या 20 वर्षांचे महाराष्ट्राचे सुपुत्र ऋषिकेश जोंधळे शहीद झाले. जोंधळे शहीद झाल्याची बातमी बहिरेवाडीच्या गावकऱ्यांना संध्याकाळी समजली. त्यानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली.
पाकिस्तानी सैन्याने आज सीमारेषेवर बारामुल्ला, गुरेज, उरी, कुपवाडा, पुँछ या भागात बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात भारताचे तीन जवान शहीद झाले आहेत. या गोळीबारात काही सर्वसामान्य नागरिकांचादेखील मृत्यू झाला आहे. पाकिस्तानाकडून करण्यात आलेल्या या गोळीबाराला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलं. भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या 7 ते 8 सैनिकांचा खात्मा केला. तर 10 ते 12 पाकिस्तानी सैनिकांना जखमी केलं.
“रविवारी आम्ही अमरावतीहून मुंबईला जाऊ. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसीठी ....
अधिक वाचा