ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

.... पुन्हा डॉक्टर नातेवाईकांच्या तावडीत

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 15, 2019 02:26 PM 2019-02-12T14:15:30+5:30

.... पुन्हा डॉक्टर नातेवाईकांच्या तावडीत

शहर : मुंबई

देशभरात डॉक्टरांच्या सुरक्षे बाबत अलीकडेच आंदोलन झाल्यानंतर काल मुंबईच्या नायर रुग्णालयात एक रुग्ण मरण पावताच त्याच्या नातेवाइकांनी 3 निवासी डॉक्टरावर हल्ला केला त्याचा बरोबर सुरक्षा रक्षकांनाही धकाबुकी करून रुग्णालयाची तोडफोड केली. या घटनेनंतर रुग्णाच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र रुग्णाच्या नातेवाईकांनीही डॉक्टराच्या हलगर्जीपनामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, राज किशोर दिक्षित यांची प्रकृती खालवल्याने त्यांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा काल संध्याकाळी मृत्यू झाला. हे सांगायला निवासी डॉक्टर गेले तेव्हा नातेवाइकांनी गोंधळ घालून . डॉक्टराना मारहाण करायला सुरवात केली. इतकच नाही तर सुरक्षा रक्षकालाही त्यांनी  ढकाबुकी केली, असा आरोप डॉक्टरानी केला आहे. तर दुसरीकडे डॉक्टरानी रुग्णाची स्थिति खालावली असताना आयसीयू मध्ये बेड नसल्याचा कारण देत रूग्णाला दाखल करून न घेतल्याने आणि सलाईन ची नळी डॉक्टराच्या हलगर्जीपणामुळे  निघाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.

अग्रिपाडा पोलिसांनी याबाबत, नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला असून रुग्णाच्या भावाला ताब्यात घेतलं आहे. या घटणेनंतर मार्डनेही निषेध नोंदविला असून पुन्हा एकदा डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत लक्ष्य घालण्याची मागणी सरकारकडे केली आहे.

मागे

 मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्ग बंद
 मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्ग बंद

खेड, चिपळूण, संगमेश्वर मध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून येथील नद्यांनी धोक्या....

अधिक वाचा

पुढे  

रत्नागिरीत चिरेखाणीत बुडून तरुणाचा मृत्यू
रत्नागिरीत चिरेखाणीत बुडून तरुणाचा मृत्यू

 शहरातील क्रांतींनगर झोपडपट्टीत राहणारा शंकर मानप्पा ढोत्रे हा 18 वर्षाचा....

Read more