By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2020 07:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
वसई, विरार, नालासोपारा क्षेत्रात रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. दोन दिवस झालेल्या अति मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटनाही समोर आल्या होत्या. या मुसळधार पावसात खेळता खेळता एक 6 वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. ऋतिका मोहन गुप्ता असे त्या मुलीचे नाव आहे. नालसोपारा परिसरात ही घटना घडली असून सध्या पोलीस त्या मुलीचा शोध घेत आहेत.
नालासोपाऱ्यातील पूर्व पेल्हार फाटा येथील नॅशनल हॉटेलजवळ ऋतिका मोहन गुप्ता राहते. तिच्या राहत्या घराच्या बाजूला मोठा नाला आहे. या नाल्याजवळ त्या मुलीचा खेळण्याचा बॉल सापडला आहे. त्यामुळे ती मुलगी त्या नाल्यात वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
मात्र ती वाहून गेल्याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. त्यामुळे वालीव पोलीस ठाण्यात अपहरणाचा (363) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस त्या मुलीचा शोध घेत आहेत, अशी माहिती वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी दिली आहे.गेल्यावर्षी दिव्यांश सिंग नावाचा 2 वर्षांचा चिमुरडा नाल्यात वाहून गेल्याची घटना घडली होती. गोरेगाव पूर्वेकडील भारतभाई चाळीत हा प्रकार घडला होता. घरातून बाहेर रस्त्यावर येत असताना तो उघड्या नाल्यात पडला आणि वाहून गेला. मुसळधार पावसामुळे नाल्यातील पाण्याचा प्रवाह जास्त होता. या घटनेला वर्ष उलटूनही अद्याप त्याचा काहीही शोध लागलेला नाही.दरम्यान वसई, विरार, नालासोपारा क्षेत्रात रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र अद्याप या भागातील काही सखल भागात पावसाचं पाणी साचलेलं आहे. त्यामुळए नागरिकांना रस्त्याच्या कडेने वाट काढत जावं लागतं आहे. त्याशिवाय सोसायटीत पाणी साचलं आहे. नालासोपारा पूर्वेकडील दर्शन अपार्टमेंट या सोसायटीत अजूनही पाणी साचलेलं आहे. तर वसई तालुक्यात गेल्या 24 तासात 60 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
आता ध्वनी लहरींवरुन (आवाजावरुन) कोरोनाचे निदान केले जाणार आहे. मुंबई महापाल....
अधिक वाचा