ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नालासोपाऱ्यात 11 वर्ष जुनी इमारत कोसळली, रहिवाशांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी नाही

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 02, 2020 11:22 AM 2019-02-12T14:15:30+5:30

नालासोपाऱ्यात 11 वर्ष जुनी इमारत कोसळली, रहिवाशांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी नाही

शहर : मुंबई

महाड इमारत दुर्घटना ताजी असतानाच नालासोपाऱ्यातही केवळ 11 वर्ष जुनी इमारत कोसळली. मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास चार मजली इमारत पडल्याची दुर्घटना घडली. सुदैवाने रहिवाशांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली. वसई विरार महापालिकेची अग्निशमन दल, तुलिंज पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

नालासोपारा पूर्व मजेठिया पार्क परिसरातसाफल्यही चारमजली इमारत होती. 2009 मध्ये ही अनधिकृत इमारत बांधण्यात आली होती. या इमारतीमध्ये एकूण 20 फ्लॅट होते. इमारत धोकादायक झाल्याने राहिवाशांना महापालिकेने बाहेर पडण्याची नोटीस दिली होती. त्यामुळे 15 कुटुंब आगोदरच दुसरीकडे राहण्यासाठी गेली होती. तर 5 कुटुंब याच इमारतीत आपला जीव मुठीत घेऊन राहत होती.

इमारतीच्या काही भिंतींची माती काल (मंगळवार 1 सप्टेंबर) रात्री 10 वाजल्यापासूनच पडत होती. त्यामुळे रहिवाशी घाबरलेल्या अवस्थेत होते. रात्री 12 च्या सुमारास सर्व रहिवासी इमारतीच्या खाली आले. मध्यरात्री एक वाजता सर्वांच्या डोळ्यासमोर अक्षरश: पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ही चारमजली इमारत कोसळली आणि काही क्षणात होत्याचे नव्हते झाले.

देवरुखकर बाहेर आले आणि

इमारतीच्या पहिल्या ते चौथ्या मजल्यावर एकूण पाच कुटुंबांचे वास्तव्य होते. चौथ्या मजल्यावर फ्लॅट क्रमांक 401 मध्ये देवरुखकर कुटुंब राहत होते. त्यांच्या घरात चार जण आहेत. इमारत कोसळण्याच्या 5 ते 10 मिनिट आधी ते चौथ्या मजल्यावरील घरात पैसे आणण्यासाठी गेले होते. पैसे घेऊन इमारतीच्या गेटबाहेर पडत नाहीत, तोच त्यांच्या पाठीमागे इमारत कोसळली असल्याचे त्यांनी सांगितले.

इमारतीत राहणारी पाचही कुटुंब वेळीच बाहेर पडल्याने सुखरुप आहेत, मात्र त्यांचे घर-संसार या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबले आहेत. घटनेची माहिती मिळताच वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. रात्रीची वेळ असल्याने इमारतीचा ढिगारा काढायलाही अडचणी निर्माण झाल्या.

रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये 25 ऑगस्टला पाच मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. अंदाजे 10 वर्षे जुनी इमारत पडल्याने एकच खळबळ उडाली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण दबले गेले होते. या दुर्घटनेत 16 जणांना प्राण गमवावे लागले होते.

 

मागे

संयत रिपोर्टर, शांत स्वभाव, 'टीव्ही 9'चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचं कोरोनाने निधन
संयत रिपोर्टर, शांत स्वभाव, 'टीव्ही 9'चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचं कोरोनाने निधन

कोरोनाकाळात संयतपणे रिपोर्टिंग करणारे टीव्ही 9 मराठीचे पुणे प्रतिनिधी पां....

अधिक वाचा