ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नांदेडमध्ये लोकप्रतिनिधींना कोरोनाचा विळखा, चार आमदारांनंतर आता खासदारालाही लागण

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2020 11:04 AM 2019-02-12T14:15:30+5:30

नांदेडमध्ये लोकप्रतिनिधींना कोरोनाचा विळखा, चार आमदारांनंतर आता खासदारालाही लागण

शहर : nanded-Waghala

नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुलापाठोपाठ चिखलीकरांची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली. नांदेडमध्ये लोकप्रतिनिधींभोवती कोरोनाचा विळखा पडलेला दिसत आहे. चार आमदारांनंतर आता खासदारालाही कोरोना झाला आहे.

नांदेड जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्यांचे वडील आणि भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. पिता-पुत्रावर औरंगाबादमध्ये उपचार सुरु आहेत.

मार्च महिन्यापासूनच चिखलीकर पिता-पुत्र दोघेही सातत्याने मतदारांच्या संपर्कात आहेत. त्यातून त्यांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सध्या या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आले. चिखलीकर यांच्या संपर्कात आलेल्या अन्य सात जणांची चाचणीही पॉझिटिव्ह आली असून त्यांच्यावरही उपचार सुरु आहेत.

नांदेडमध्ये लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. याआधी काँग्रेसच्या चार आमदारांना कोरोनाची लागण झाली होती.

हदगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार माधवराव जवळगावकर गेल्या आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळले. जवळगावकर यांच्यावर मुंबईत उपचार सुरु आहेत. माधवराव जवळगावकर हे नांदेड काँग्रेसमधील मोठे नेते आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह आलेले काँग्रेसचे दिग्गज नेते आणि ठाकरे सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे आणि काँग्रेसचेच विधान परिषदेवरील आमदार अमरनाथ राजूरकर यांनी कोरोनावर मात केली आहे.

नांदेडमधील कोरोना पॉझिटिव्ह लोकप्रतिनिधी

1) अशोक चव्हाण (आमदार- भोकर, काँग्रेस) – कोरोनामुक्त

2) मोहन हंबर्डे (आमदार- नांदेड दक्षिण, कॉंग्रेस ) – कोरोनामुक्त

3) अमरनाथ राजूरकर (आमदारविधानपरिषद, कॉंग्रेस) – कोरोनामुक्त

4) माधव जवळगावकर (आमदार- हदगाव, कॉंग्रेस) – उपचार सुरु

5) प्रवीण पाटील चिखलीकर (नांदेड जिल्हा परिषद सदस्य) – उपचार सुरु

6) प्रताप पाटील चिखलीकर (खासदार- नांदेड, भाजप) – उपचार सुरु

मागे

देशात झपाट्याने होतोय कोरोनाचा संसर्ग, रुग्णांची संख्या 20 लाखांवर
देशात झपाट्याने होतोय कोरोनाचा संसर्ग, रुग्णांची संख्या 20 लाखांवर

देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने होत आहे. दररोज 50 हजाराहून अधिक नवीन ....

अधिक वाचा

पुढे  

...म्हणून पिंपरी चिंचवडमधील 'या' चार रुग्णालयांना धाडल्या नोटीस!
...म्हणून पिंपरी चिंचवडमधील 'या' चार रुग्णालयांना धाडल्या नोटीस!

पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अशातच अने....

Read more