By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 09, 2019 03:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : सातारा
नारायण राणेंच्या पुस्तकाने नव्या वादाला सुरूवात झाली आहे. नारायण राणे यांनी 'No Hold Barred : My Years in Politics' नावाचे आपले आत्मचरित्र लिहले आहे. पुस्तक प्रकाशित होण्याच्या अगोदरच त्या पुस्तकावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सातार्यात पत्रकार परिषदेत आत्मचरित्राविषयी प्रतिक्रिया दिली.
उपस्थित पत्रकारांनी ’मातोश्री’ बॉम्बने उडवून अज्ञातांचा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या हत्येचा कट होता. या नारायण राणेंच्या दाव्यावर पवारांना प्रश्न विचारला. यावेळी मी पुस्तक वाचले नाही. यावर आत्ताच बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली. पुस्तक वाचून सविस्तर प्रतिक्रिया देईन, असं शरद पवार म्हणाले. ’मातोश्री’ बॉम्बने उडवून अज्ञातांचा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या हत्येचा कट होता, असा खळबळजनक दावा नारायण राणेंनी आपल्या आत्मचरित्रात केला आहे.
वाराणसीतल्या लक्सा भागात राहणारा दीपक कुमार कपडे विकण्याचं काम करायचा. त्य....
अधिक वाचा