By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 29, 2019 12:39 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
भारतात सध्या 3 हजार वाघ आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी भारत कटिबद्ध आहे. त्यामुळे वाघांसाठी भारत हा जगातील सुरक्षित अधिवासांसाठी एक स्थळ असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
आजच्या जागतिक व्याघ्रदिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना नरेद्र मोदी बोलत होते. ते पुढे असेही म्हणाले की, 9 वर्षापूर्वी अमेरिकेच्या सेंट पिटर्सबर्ग येथे 2022 पर्यत भारतातील वाघांची संख्या दुप्पट करण्याची शपथ घेण्यात आली होती. भारताने हे लक्ष चार वर्ष आधीच साध्य केले आहे. भारतातील व्याघ्र संवर्धन मोहिमेची. 'एक था टायगर' पासून सुरू झालेली कहाणी 'टायगर जिंदा है' पर्यंत पोहोचली. हा प्रवास एवढ्यावरच थांबणार नाही. यंदा जाहीर झालेले व्याघ्रगणनेचे आकडे सुखावणारे आहेत. व्याघ्रगणना अहवालातील माहिती नुसार 2010 मध्ये भारतात 1706 वाघ होते. 2014 मध्ये वाघांच्या संख्येत वाढ होऊन ती 2226 इतकी झाली. तर 2018 माहे वाघांच्या संख्येत 741 ने वाढ झाली आहे. तर महाराष्ट्रात आजच्या घडीला 230-240 वाघ आहेत. मात्र चिंतेची बाब म्हणजे वाघांची संख्या वाढली तरी त्यांच्या मृत्युचे प्रमाणही वाढले आहे.
शहीद जवानांच्या मुलांचा के. जी टू पी.जी असा खर्च न्यासातर्फे उचलण्याचा निर्....
अधिक वाचा