By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 15, 2019 12:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने तिन्ही सैन्य दलांमध्ये अधिक सुसूत्रता आणण्यासाठी '" या पदाची निर्मिती केली जाणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. देशाच्या 73 व्या स्वतंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केले. यावेळी 1 तास 20 मिनिटे मोदींनी भाषण केले. यात त्यांनी कलम 370, तिहेरी तलाक, अर्थव्यवस्था, गरीबी निर्मूलन, एक देश एक निवडणूक अशा अनेक मुंदद्यांवर भाष्य केले. पंतप्रधान म्हणून सलग 6 व्यांदा भाषण करणारे मोदी हे बिगर कोंग्रेसी दुसरे नेते ठरले आहेत. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या नावावर हा विक्रम आहे. त्यांची बरोबरी आज मोदींनी केली.
आजच्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी पुढे सांगितले की, राजकीय स्थैर्यामुळे विकासाची मोठी संधी आहे. देशातील सर्व लहान सहान घटकांनी एकत्र मिळून काम केले तर 5 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दीष्ट नक्कीच साध्य करता येईल. यासाठी आगामी काळात सरकार आधुनिक पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात मोठी करणार आहे, असेही मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे
1. सरकार आल्यानंतर अवघ्या 10 आठवड्यात कलम 70 हटवल
2. तिहेरी तलाक संमत करून मुस्लिम महिलाना अनिष्ट प्रथेतून मुक्त केले.
3. 'जीएसटी' ने 'वन नेशन वन टॅक्स' करण्यात यश
4. देशाने 'एक देश एक निवडणुकी' वर विचार करायला हवा.
5. केंद्र आणि राज्य एकत्र मिळून 3.5 लाख कोटी 'जल जीवन मिशन' योजनेवर खर्च करणार.
6. बढती लोकसंख्या देशासमोरील मोठ खडतर आव्हान.
7. भ्रष्टाचारविरोधात आम्ही मोठ काम केल, यापुढे तंत्रज्ञानाचा वापर करून भ्रष्ट्राचाराचा समूळ
नायनाट करू.
8. आधनिक पायाभूत सुविधांसाठी 100 लाख कोटींची गरज
9. गेल्या 5 वर्षात आम्ही 3 लाख ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था केली.
10. शांती आणि सुरक्षा देशाच्या विकासासाठी अत्यावश्यक
11. पुरग्रास्थांच्या मदतीसाठी सरकार कटिबद्ध
12. आपण रासायनिक खतांचा वापर 20 ते 25 टक्क्यांनी कमी केला तरी मोठी देशसेवा होईल.
13. शेतीमध्ये कीटकनाशकांचा अतिवापर करून आपण जमिनीचा र्हास करतोय.
14. 2022 पर्यंत देशातील किमान 15 पर्यंटन स्थळांना भेट द्या.
15. तुम्ही दुर्गम ठिकाणी गेलात तरच त्या भागात पर्यटन सुविधा विकसित होतील. तरच जगातील
लोकही तेथे जातील.
16. सणाच्या दिवशी एकमेकांना कापडाच्या पिशव्या भेट द्या.
17. गेल्या पाच वर्षांमध्ये प्रत्येक दिवसाला एक आशा प्रकारे गरज नसलेले एकूण 1 हजार 450
कायदे रद्द केले.
18. आम्ही समस्यांना टाळत नाही आणि त्या अस्तित्वातही ठेवत नाही.
19. देश स्वतंत्र झाल्यानंतर विकास, शांती आणि स्थैर्यासाठी झटणार्या लोकांना अभिवादन
20. देशासाठी बलिदान देणार्याना अबिवादन
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांनी 73 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व....
अधिक वाचा