ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पोलिसाच्या बुलेटप्रुफ जॅकेटमध्ये गोळी घुसली पण पाकिटामुळे जीव वाचला

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 22, 2019 11:18 AM 2019-02-12T14:15:30+5:30

पोलिसाच्या बुलेटप्रुफ जॅकेटमध्ये गोळी घुसली पण पाकिटामुळे जीव वाचला

शहर : देश

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात उत्तर प्रदेशात आंदोलनाचा भडका उडाला आहे. यामध्ये आतापर्यंत १८ जणांचे बळी गेले आहेत. मात्र, शनिवारी फिरोजाबादमध्ये आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या पोलिसांवर गोळीबार झाल्याचा प्रकार घडला. यावेळी विजेंद्र कुमार या पोलीस कर्मचाऱ्याचा जीव थोडक्यात वाचला. विजय कुमार यांचे दैव इतके बलवत्तर होते की, गोळीने बुलेटप्रुफ जॅकेट भेदूनही त्यांना इजा झाली नाही. त्यांनी वरच्या खिशात ठेवलेल्या पाकिटात ही गोळी अडकली.

या घटनेनंतर मला पुनर्जन्म मिळाल्यासारखे वाटत आहे, अशी प्रतिक्रिया विजय कुमार यांनी व्यक्त केली. आम्ही दगडफेक करणाऱ्या जमावाचा पाठलाग करत होतो. त्यावेळी माझ्यावर गोळी झाडण्यात आली. ती गोळी माझ्या बुलेटप्रुफ जॅकेटमध्ये शिरली. मात्र, गोळी माझ्या छातीत शिरली नाही कारण मी खिशात पाकीट ठेवले होते. या पाकिटात शंकराचा फोटो होता, असे विजेंद्र कुमार यांनी सांगितले.

मात्र, विजेंद्र कुमार यांचे सहकारी असलेले धर्मेंद्र तेवढे सुदैवी ठरले नाहीत. आंदोलकांपैकी एकाने झाडलेली गोळी त्यांच्या पायावर लागली. सध्या धर्मेंद्र यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापूर्वी अहमदाबादमध्येही हिंसक जमावाने पोलिसांना घेरून त्यांच्यावर तुफान दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला होता. यामध्ये पोलीस उपायुक्तांसह जवळपास १९ पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.

मागे

NRC : काँग्रेसचा विरोध, सोनिया गांधींचे उद्या धरणे आंदोलन
NRC : काँग्रेसचा विरोध, सोनिया गांधींचे उद्या धरणे आंदोलन

नागरिकत्व कायद्याला देशभरात विरोध होत असताना, दिल्लीतल्या राजघाट इथे काँग....

अधिक वाचा

पुढे  

कोकण रेल्वे मार्गावर आता मेगाब्लॉक, या गाड्यांना फटका
कोकण रेल्वे मार्गावर आता मेगाब्लॉक, या गाड्यांना फटका

             मुंबई - कोकण रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ....

Read more