By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 19, 2019 01:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
7 सप्टेंबरच्या चंद्रयान 2 च्या मोहिमेतील विक्रम लँडरचा तुटलेल्या संपर्काने इस्रो पूर्ण क्षमतेने पुन्हा एकदा विक्रम सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र ओरबिटोरने पाठविलेल्या छायाचित्राव्यतिरिक्त इतर काहीच माहिती मिळू न शकल्याने संपर्क होत नव्हता. त्याच्या ह्या प्रयत्नाला अमेरिकेच्या नासा या संस्थेने त्यांच्यावतीने विक्रम सोबत संपर्क साधण्यासाठी मदतीचा हात देऊ केला आणि त्यांच्याकडूनही प्रयत्न केले गेले.
नासाने त्यांच्या 'लुणार रिकन्सेस' या ओरबिटोरच्या माध्यमातून संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोही संपर्काचा प्रयत्न फसला आहे. कारण विक्रम लँडर ज्या ठिकाणी चंद्रावर उतरला ते ठिकाण नासाच्या ओरबिटोरच्या क्षेत्रात नसल्याने त्याने काढलेल्या छायाचित्रात विक्रम दिसत नसल्याची शक्यता व्यक्त केली आहे. नासाचे हे ओरबिटोर गेली 10 वर्षे चंद्राच्या कक्षेत फिरत आहे.
'लुणार रिकन्सेस' च्या वाटेत विक्रम येत नसल्याने नासाकडून विक्रमचा संपर्क करण्याचा प्रयत्न फसला आहे.
आपल्या विविध मागण्यासाठी शिक्षकांचे एक शिष्टमंडळ काल मंत्र्यांना भेटण्या....
अधिक वाचा