ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सरकार कविता राऊतला नोकरी देऊ शकत नसेल तर काही तरी गडबड, राज्यपालांची ठाकरे सरकारवर टिप्पणी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 04, 2021 10:36 AM 2019-02-12T14:15:30+5:30

सरकार कविता राऊतला नोकरी देऊ शकत नसेल तर काही तरी गडबड, राज्यपालांची ठाकरे सरकारवर टिप्पणी

शहर : नाशिक

“आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिला राज्य सरकार आणि क्रीडा मंत्री सुनिल केदार (Governor Bhagat Singh Koshyari Criticize Thackeray Government) नोकरी देऊ शकत नसतील तर काहीतरी गडबड आहे, असं राज्याचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी नाशकात म्हणाले. बुधवारी ते नाशिक दौऱ्यावर होते. तिथे त्यांनी नाशिकमधील नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंडच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला (Governor Bhagat Singh Koshyari Criticize Thackeray Government).

राज्यपाल काय म्हणाले?

आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिला राज्य सरकार आणि क्रीडा मंत्री सुनिल केदार नोकरी देऊ शकत नसतील तर काहीतरी गडबड आहे, असं म्हणत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर टीका केली. “विशेष म्हणजे आदिवासी भागात शिक्षक मिळत नसतील तसेच शिक्षकांची भरती होत नसेल तर महाराष्ट्र सरकार काय करतय?” असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

सरकार नेमकं काय करतंय?; राज्यपालांचा सवाल

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुलाबी गाव भिंतघर या ठिकाणी हजेरी लावली. यावेळी त्यांच्या हस्ते सुरगणा येथे आदिवासी लाभार्थ्यांना वनकट्ट्यांचं वाटप करण्यात आलं. एकूण 11137 लाभार्थ्यांना राज्यपालांच्या हस्ते सातबारा प्रदान करण्यात आले. त्यावेळी राज्यपालांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं.

याप्रसंगी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळही उपस्थित होते. यावेळी झिरवळ यांनी राज्यपालांकडे या भागाची समस्या मांडली. या भागात भरपूर पाऊस पडतो. पण सर्व पाणी समुद्राला वाहून जातं. पाणी अडवण्यासाठी तुम्ही मदत करा. हा भाग समृद्ध होईल, असं झिरवळ म्हणाले (Governor Bhagat Singh Koshyari Criticize Thackeray Government).

झिरवळ यांच्या मागणीचा हाच धागा पकडून राज्यपालांनी राज्य सरकारला टोले लगावले. झिरवळ सरकारमध्ये आहेत. पण ते माझ्याकडे मागणी करतात. मग राज्य सरकार काय करतंय?, असा सवाल करत त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं.

मी राज्यपाल नाही. तर राज्याचा सेवक – राज्यपाल

मी राज्यपाल नाही. तर राज्याचा सेवक आहे. दान देणाऱ्या दानशुरांमुळेच देश चालतो. अंध विद्यार्थ्यांकडून काम करणाऱ्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना दैवी देणगी मिळाली आहे. त्यामुळे दृष्टी बाधितांसाठी काम करणाऱ्यांना अभिवादन. शासनात काम करणाऱ्यांना देखील दैवी दृष्टी मिळावी,” असा टोला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लगावला.

 

मागे

विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरुन त्यांना शिष्यवृत्ती द्या, धनंजय मुंडेंचा आदेश
विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरुन त्यांना शिष्यवृत्ती द्या, धनंजय मुंडेंचा आदेश

कोविड प्रादुर्भावामुळे शाळा महाविद्यालये जरी बंद असली तरी ऑनलाईन, डिजिटल, ....

अधिक वाचा

पुढे  

दिल्लीत पुन्हा एकदा मोदी Vs केजरीवाल? उपराज्यपालांचे अधिकार वाढणार; केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
दिल्लीत पुन्हा एकदा मोदी Vs केजरीवाल? उपराज्यपालांचे अधिकार वाढणार; केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी

दिल्लीच्या उपराज्यपालांना अधिक अधिकार देण्याच्या विधेयकाला आज केंद्रीय क....

Read more