By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 27, 2020 12:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : नाशिक
मेणबत्तीच्या प्रकाशात सॅनिटाईझ करताना भडका उडाल्याने नाशिकमधील महिलेचा मृत्यू झाला. आगीचा भडका उडून 90 टक्के भाजलेल्या महिलेने उपचारादरम्यान चार दिवसांनी प्राण सोडले.
वीज पुरवठा खंडित झाल्याने रजबीया शेख यांनी घरात मेणबत्ती लावली होती. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी याच वेळी त्या आपले घरही सॅनिटाईझ करत होत्या. त्याचवेळी आगीचा भडका उडाला आणि रजबीया शेख भाजल्या, असा दावा केला जात आहे.
नाशिक शहरातील वडाळा गावात ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातात रजबीया 90 टक्के भाजल्या होत्या. त्यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते.
गेल्या सोमवारी म्हणजे 20 जुलै रोजी रात्री ही घटना घडली होती. मात्र 24 जुलै रोजी मध्यरात्री नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मेणबत्तीच्या संपर्कात सॅनिटायझरमधील अल्कोहोलयुक्त पदार्थ आल्याने आगीचा भडका उडाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. नाशिकमधील इंदिरानगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग टाळण्यासाठी आपले हात वारंवार धुवावे, सॅनिटायझर वापरावा, असे आवाहन अनेक वेळा केले जाते. मात्र ते वापरताना केलेली हलगर्जी जीवावर बेतू शकते, याचे उदाहरण समोर आले आहे.
पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर रुग्....
अधिक वाचा