By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 06, 2021 09:55 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : नाशिक
नाशिकचे आमदार दिलीप बनकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे (Dilip Bankar Son Wedding). आमदार पुत्राच्या शाही विवाह सोहळ्या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करावी, असे आदेश विभागीय आयुक्तांनी पोलिसांना दिले आहेत. त्याशिवाय, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
गेल्या दोन दिवसांपासून कारवाई बाबत पोलीस आयुक्त आणि जिल्ह्याधिकारी यांच्याकडून टोलवाटोलवी सुरु असल्याचं चित्र होतं. मात्र, आता थेट विभागीय आयुक्तांनी पोलिसांना कारवाईचे आदेश दिल्याने आमदार दिलीप बनकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
नेमकं प्रकरण काय?
राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांच्या मुलाच्या लग्नात सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालेला पाहायला मिळाला. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांच्या मुलाच्या लग्नात मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचा या लग्न सोहळ्यात बोजवारा उडाल्याचं चित्र समोर आलं. या लग्नसोहळ्याला राष्ट्रवादीचे आमदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) , अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारीसुद्धा उपस्थित होते. या लग्न सोहळ्याला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. निफाडचे राष्ट्रवादी आमदार दिलीप बनकर यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात हजारोंच्या संख्येने वऱ्हाडी मंडळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांसह अनेक शासकीय अधिकारी ही उपस्थित होते. नाशिक शहरातील बालाजी लॉन्समध्ये हा विवाह सोहळा झाला असून, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाची पुरती पायमल्ली करण्यात आली.
या लग्न सोहळ्यात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची पायमल्ली करण्यात आली असून, सोशल डिस्टन्सिंग न पाळता लोक एकमेकांच्या अगदी जवळ उभे राहिल्याचे पाहायला मिळालं.
दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच....
अधिक वाचा