By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 29, 2020 06:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : नाशिक
नाशिकमध्ये पीपीई किट बनवणाऱ्या कंपनीतील तब्बल 44 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. पालखेड एमआयडीसीतील संबंधित कंपनी तातडीने बंद करण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यात दिंडोरीतील पालखेड औद्योगिक वसाहतीत पीपीई किट तयार करणारी कंपनी आहे. या कंपनीतील तब्बल 44 कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सर्व कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांना प्रशासनाच्या कोव्हिड सेंटर मध्ये ठेवण्यात आलं आहे. तर कंपनीतील इतर कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
अत्यावश्यक सेवा म्हणून पीपीई किट बनवणाऱ्या कंपनीला लॉकडाऊनमध्येही काम सुरु ठेवण्याची मुभा होती. मात्र मोठ्या संख्येने कोरोनाग्रस्त कर्मचारी आढळल्याने कंपनी बंद करण्याची वेळ आली आहे.
संबंधित कंपनीचे पीपीई किट वापरणाऱ्या कोव्हिड योद्ध्यांचे जीव धोक्यात येण्याची भीती वर्तवली जात आहे. या कंपनीत मानवी स्पर्शाविना काम चालतं का? नसल्यास या कंपनीत उत्पादन झालेल्या पीपीई किटचं काय होणार? त्याची तपासणी होणार का? गेल्या काही दिवसातील काही बॅचचा माल विकणे किंवा वापरावर बंदी येणार का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांन....
अधिक वाचा