By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 26, 2019 04:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
भारतीय नौदलाच्या आयएनएस विक्रमादित्य या युद्धनौकेवर शुक्रवारी आग लागल्याची दुर्घटना घडली. यामध्ये एका नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याचे समजते. नौदलाच्या कारवार येथील तळावर ही दुर्घटना घडली. आयएनएस ही भारताची एकमेव विमानवाहू युद्धनौका आहे. कारवार बंदरात शिरताना युद्धनौकेवर अचानक आग लागली. ही आग विझवण्यासाठी नौदलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. लेफ्टनंट कमांडर डीएस चौहान हे आग विझवण्यात आघाडीवर होते. यावेळी धूर आणि आगीच्या ज्वालांमुळे त्यांची शुद्ध हरपली. आग विझवल्यानंतर त्यांना तातडीने नौदलाच्या कारवार येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोणच्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
नौदलाच्या जवानांनी आग वेळीच आटोक्यात आणल्यामुळे कोणतीही मोठी हानी झाली नाही. दरम्यान, आता या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. रशियन बनावटीची आयएनएस विक्रमादित्य २०१४ साली भारतीय नौदलात दाखल झाली होती. २८४ मीटर रुंदी आणि ६० मीटर उंची असलेली आयएनएस ही भारतीय नौदलातील सर्वात मोठी युद्धनौका आहे.
लातूरच्या बसस्थानकात काल मध्यरात्री गोळीबार झाल्याने मोठा गोंधळ उडाला. व न....
अधिक वाचा