ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नवी मुंबईत 'मिशन ब्रेक द चेन', पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचा उपक्रम

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 23, 2020 10:03 AM 2019-02-12T14:15:30+5:30

नवी मुंबईत 'मिशन ब्रेक द चेन', पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचा उपक्रम

शहर : मुंबई

नवी मुंबईतील कोरोनाचा उद्रेक रोखण्याचे मोठे आव्हान महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासमोर आहे. महापालिकेने ‘मिशन ब्रेक द चेन’ हा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या वतीने कोविड19 च्या संदर्भात अनेक पावलं उचलली जात आहेत. पालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, मेडिकल स्टाफ 24 तास – रात्रंदिवस आपली कामगिरी चोख पार पाडताना दिसून येत आहेत.

रोज वाढणारी कोविड रुग्णसंख्या, कंटेन्मेंट झोन लक्षात घेता ‘चेन ऑफ इन्फेक्शन’ तोडण्यासाठी युद्ध पातळीवर उपक्रम राबवणे गरजेचे आहे. त्यामुळे महानगरपालिकेने ‘मिशन ब्रेक द चेन’ हाती घेतले आहे.

या उपक्रमा अंतर्गत शॉर्ट टर्म, मिडीयम टर्म आणि लॉंग टर्म असे तीन स्तरीय निर्णय घेण्यात आले आहेत. सर्वप्रथम 31 जुलैपर्यंत हॉटस्पॉट भागातील लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.

ज्या ठिकाणी लॉकडाऊन वाढवला आहे, त्या ठिकाणी दहा दिवस देखरेख आणि स्क्रिनिंग केली जाईल. या माध्यमातून जास्तीत जास्त तपासणी करणे आणि त्यांच्यापैकी कोणी पॉझिटिव्ह असेल तर त्याच्या उपचारासाठी लागणारा कालावधी यावर अंकुश ठेवला जाईल.

महत्त्वाचं म्हणजे आपला ‘टर्न अराउंड टाइम’ कमी करण्यासाठी अँटीजनचे प्रमाण वाढवलं आहे. जेणेकरुन नागरिकांना अहवाल लगेच हाती मिळू शकतील. नागरिकांच्या सहकार्यातून आणि कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून ‘मिशन ब्रेक द चेन’मध्ये आपण यशस्वी होऊ, असा विश्वास अभिजित बांगर यांनी व्यक्त केला.

नवी मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत असून मृतांची संख्याही वाढत आहेत. वाढत्या संसर्गामुळे शहरात काल (22 जुलै) 303 नवे रुग्ण वाढले असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 12,269 झाली आहे. तर मृतांची एकूण संख्या 358 झाली आहे. शहरात आतापर्यंत तब्बल 7,925 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

 

मागे

पुढच्या वर्षी ऑफिसला या! आयटी कंपन्यांना 31 डिसेंबरपर्यंत 'वर्क फ्रॉम होम'ला मुदतवाढ
पुढच्या वर्षी ऑफिसला या! आयटी कंपन्यांना 31 डिसेंबरपर्यंत 'वर्क फ्रॉम होम'ला मुदतवाढ

आयटी आणि बीपीओ कंपन्यांतील कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यास दि....

अधिक वाचा

पुढे  

पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा तालुक्यात पुन्हा लॉकडाऊन
पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा तालुक्यात पुन्हा लॉकडाऊन

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. आता कोरोनाचा शिरकाव हा ग्र....

Read more